व्हीएस न्यूज – केंद्रातील मोदी सरकारने राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी, व्याजमुक्त निवडणूक मुद्रांकाची घोषणा केली असून हे मुद्रांक जानेवारी, एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये भारतीय स्टेट बँकेमधून खरेदी करता येऊ शकतात. या निवडणूक मुद्रांकांवर व्यक्तीचे नाव नसेल.
फक्त अधिकृत बँक खात्यातून या मुद्रांकांचे १५ दिवसांच्या रोखीत रुपांतर करता येऊ शकते. १,००० रु, एक लाख रु, १० लाख रुपये व एक कोटी रुपयांच्या किंमतीत निवडणूक मुद्रांक उपलब्ध असतील अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली.
राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल समजले जात आहे. जेटली यांनी २०१७-२०१८ या आर्थिक वर्षाच्या संकल्पात निवडणूक मुद्रांकाची योजना जाहीर केली होती. जेटली यांनी सांगितले की, राजकीय पक्षांना सध्याच्या काळात जास्तीतजास्त निधी हा रोख स्वरुपात मिळतो. या व्यवहारात पारदर्शकता नसल्यात जमा असते, परंतु आता यात निवडणूक मुद्रांकामुळे अधिक पारदर्शकता येईल. या मुद्रांकांचा लाभ ज्या नोंदणीकृत राजकीय पक्षांना, मागील निवडणुकीत कमीतकमी एक टक्के मते मिळाली आहेत त्यांना घेता येणार आहे, असे जेटली यांनी जाहीर केले आहे.
व्हीएस न्यूज – भाजपमधील वाचाळवीरांनी गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा उचल खाल्ल्याचे चित्र सध्या दिसत असून नरेंद्र सिंह तोमर, नेपालसिंह, बनवारीलाल सिंघल या नेत्यांच्या पाठोपाठ मुजफ्फरनगरमधील भाजपचे आमदार विक्रम सैनी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. मुजफ्फरनगरच्या खतौली मतदारसंघाचे विक्रम सैनी हे आमदार आहेत. सोमवारी नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी यावेळी म्हटले की, भारत हा हिंदूंचाच देश असून दाढीवाल्यांना येथे काही नालायक नेत्यांनी थांबवून ठेवले आहे. आपली जमीन आणि संपत्ती या लोकांनी बळकावली आहे. हे लोक आज आपल्या देशात नसते तर सर्वकाही हिंदूंना मिळाले असते, असे विक्रम सैनी यांनी म्हटले.
समाजवादी पक्षालाही यावेळी सैनी यांनी लक्ष्य केले. विशिष्ट समुदायाच्याच लोकांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ समाजवादी पक्ष सत्तेत असताना मिळायचा. पण ‘सबका साथ, सबका विकास’ या विचारसरणीनुसार भाजपचे सरकार काम करते. पक्षपातीपणे आणि विशिष्ट समुदायाला फायदा मिळवून देण्याच्यादृष्टीने यापूर्वीचे सरकार काम करत होते. जितकी लांब दाढी असेल तितकी मदत सरकारकडून मिळायची, अशी टीका सैनी यांनी केली. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वाद तापण्याची शक्यता आहे.
व्हिएस न्यूज - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटले आहेत. भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या बंदची हाक दिली आहे. काही वेळापूर्वीच होणाऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. तसेच या महाराष्ट्र बंदला राज्यातील सगळ्या संघटनांनी सहकार्य करावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सोमवारी झालेल्या घटनेनंतर आज राज्यभरात कार्यकर्त्यांनी बंद पुकारला असेल तर मागे घ्यावा, आंदोलन थांबवावे असेही आवाहन त्यांनी केले. सोमवारी उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच या ठिकाणी उसळलेल्या हिंसाचाराची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात दुपारी दोन वाजेपर्यंत मिळालेली नव्हती असेही त्यांनी म्हटले आहे. शिवराज प्रतिष्ठान आणि हिंदू एकता आघाडी यांनी हा हिंसाचार घडवून आणला असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला....Read More
व्हीएस न्यूज - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे पुणे, पिंपरी चिंचवड आणि आळंदी येथे भाजपची सत्ता यावी हे स्वप्न होते. या स्वप्नांची मागील वर्षात पुर्तता झाली आहे. त्यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती समिती पिंपरी चिंचवड शहर समिती यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
समितीच्या वतीने बुधवार दि.३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता, थोपटे लॉन्स रहाटणी काळेवाडी रस्ता येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आणि आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंतीताई उमरगेकर, पायलट रमीला रामकीसन लटपटे यांचा सत्कार ग्रामविकास व महिला बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास पशू संवर्धनमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार सुजितसिंह ठाकूर, महेश लांडगे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, भाजपा संघटनमंत्री सुनिल कर्जतकर, भाजपा प्रदेश सचिव उमा खापरे, पश्चिम महाराष्ट्र भाजपा संघटन मंत्री रवि अनासपुरे, भाजपा पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, ज्येष्ठ नेते आझमभाऊ पानसरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजाताई मोरे, पीएमआरडीचे संचालक किरणकुमार गिते, पुणे मार्केट सभापती दिलीप खैरे आदी प्रमुख पाहुणे आणि पुणे, पिंपरी चिंचवड व आळंदीतील सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती समिती पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या संयोजनात भगवान सेना पिंपरी चिंचवड, राष्ट्रसंत भगवानबाबा प्रतिष्ठान पुणे, बीड जिल्हा मित्र मंडळ, जय भगवान युवा फांऊडेशन, ब्रम्हचैतन्य फांऊडेशन, मराठवाडा जन विकास संघ पिंपरी चिचंवड, मराठवाडा मित्रमंडळ, भगवानबाबा मित्र मंडळ, लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठा पिंपरी चिंचवड, लोकनेते गोपीनाथ मुंडे विचार मंच पिंपरी चिंचवड आदी संस्थांनी सहभाग घेतला आहे.
या कार्यक्रमाच्या संयोजनात सदाशिव खाडे, योगिता नागरगोजे, माऊली थोरात, मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, बाबू नायर, रघुनंदन घुले, अशोक सोनवणे,अरुण पवार, सुभाष दराडे, श्रीनिवास बढे, ज्ञानेश्वर नागरगोजे, सलीम शिकलगार, आबा नागरगोजे, गणेश ढाकणे, दीपक नागरगोजे आदींचा सहभाग आहे.
व्हीएस न्यूज - चार मल्लांना माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी दत्तक घेतले आहे.
शरद पवारांनी तीन वर्षांसाठी दुहेरी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारे, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता उत्कर्ष काळे, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत या पैलवानांना दत्तक घेतले आहे. स्वतः शरद पवार या चारही पैलवानांच्या बाहेरील देशातील प्रशिक्षण, खुराक, राहणे या सर्वाचा खर्च करणार आहेत.
पुण्यातील शिवरामदादा तालीमचा यातील अभिजित कटके हा मल्ल असून किरण भगत, उत्कर्ष काळे आणि राहुल आवारे हे ऑलिम्पियन काका पवार यांच्या पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील मल्ल आहेत. कुस्ती संघटना विविध उपक्रम राबवत असते. खेळाडू गुणवाण आणि होतकरू असतात मात्र, पैशांअभावी त्यांना कुस्तीपटू बनण्यात अडचणी येतात. यामुळे या चार मल्लांना पवारांनी दत्तक घेतले आहे. या तीन वर्षात या चौघांना मात्र कामगिरी उत्तम करावी लागणार आहे.
व्हीएस न्यूज – केंद्रीय मंत्रीमंडळाने गेल्या महिन्यात मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार डेबिट कार्ड, भीम अॅप तसेच इतर देयकांद्वारे २ हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार केल्यास ग्राहकांना आता व्यवहार शुल्क भरावा लागणार नाही आहे. व्यापारी २ हजार रुपयांपर्यतच्या डिजीटल व्यवहारांवर सवलत दर आकारला जाणार आहे. मंत्रीमंडळाने हा निर्णय डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतला आहे.
भीम अॅपद्वारे डिसेंबरच्या तिमाहीमध्ये व्यवहार ८६ टक्क्यांनी वाढून १४५.६ दशलक्षांवर पोहोचला असून १३,१७४ कोटींचा महसूल त्यातून मिळाला आहे. डेबिट कार्ड किंवा भीप अॅपद्वारे केलेल्या २ हजारपर्यंतच्या व्यवहारांवरचे व्यवहार शुल्क डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकार भरणार आहे. तसेच व्यापारांना शुल्क नसणार आहे, अशी माहिती वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी ट्विटद्वारे दिली आहे. डेबिट कार्ड, भीम अॅप तसेच इतर देयकांद्वारे २ हजार रुपयांपर्यंतचा व्यवहारांवर २ वर्षांसाठी १ जानेवारी २०१८ पासून व्यापारी सवलत कर हा लागू करण्यात आला आहे. सरकार बँकांना याची भरपाई करणार आहे. सरकारी तिजोरीवर या निर्णयामुळे २,५१२ कोटींचा भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
व्हीएस न्यूज - आजवर अनेक प्रकारच्या भूमिका बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने साकारल्या आहेत. तो पहिल्यांदाच आता एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. त्याचा बुटका अवतार असलेला ‘झीरो’या चित्रपटातील लुक प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तो यात धमाल उडवताना दिसत आहे. त्याच्या चित्रपटाची पहिली झलक रेड चिली एम्टरटेन्मेंटच्या अधिकृत ट्विटरवर प्रसिध्द करण्यात आली आहे. अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करीत आहेत. ‘झीरो’ हा चित्रपट २१ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.
व्हीएस न्यूज – भारताच्या परराष्ट्र सचिवपदी मराठमोळे आयएफएस अधिकारी विजय केशव गोखले यांची निवड झाली आहे. चीनमध्ये गोखले यांनी भारतीय राजदूत म्हणून काम केले आहे. त्यांची डोकलाम वाद मिटवण्यात महत्त्वाची भूमिका होती. गोखले यांच्या नियुक्तीबाबत अधिकृत आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
पुढील २ वर्षांसाठी महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले गोखले भारताचे परराष्ट्र सचिव असणार आहेत. येत्या २८ जानेवारी रोजी विद्यमान परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर जयशंकर यांच्याकडून परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे विजय गोखले स्वीकारतील.
भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) १९८१च्या बॅचचे विजय गोखले हे अधिकारी आहेत. सध्या ते परराष्ट्र खात्यात सचिव (आर्थिक घडामोडी) पदावर कार्यरत आहेत. गोखले यांनी याआधी जर्मनी, हाँगकाँग, चीन आणि मलेशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. गोखले यांची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने परराष्ट्र सचिवपदावर नियुक्ती केली आहे. डोकलाम वादात गोखले यांचे नाव चर्चेत आले होते. गोखले यांनी या वादात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.
व्हीएस न्यूज - भाजप खासदार नेपालसिंह यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतीय सैन्याच्या जवानांचा अवमान करणारे विधान केले असून सैनिक म्हटले तर त्यांचे प्राण जाणारच. जगात असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याच्या जवान मरत नाही, असे संतापजनक विधान नेपालसिंह यांनी केले आहे. आता सर्वच स्तरातून नेपालसिंह यांच्यावर टीका होत असून सैन्यातील जवानांचा अपमान करणाऱ्या नेपालसिंह यांनी माफी मागावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १८५ व्या बटालियनच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. ५ जवान या हल्ल्यात शहीद झाले होते. उत्तर प्रदेशमधील रामपूरचे खासदार नेपालसिंह यांना या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला. पण दहशतवादाऐवजी जवानांबाबत नेपालसिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, सैनिक असल्याने त्यांचा जीव जाणारच. जगात असा कोणता देश आहे की जिथे सैन्यातील जवान मरत नाही. त्यांनी आपल्या विधानाचे समर्थन करताना थेट गल्लीतील भांडणाचा दाखला दिला. नेपालसिंह यांची वाचाळगिरी येथेच थांबली नाही. पत्रकारांनाच त्यांनी प्रश्न विचारला. तुम्ही असे डिव्हाईस मला दाखवा की ज्यामुळे माणूस मरणार नाही. बंदुकीची गोळीही परिणाम करु शकणार नाही, अशी वस्तू दाखवा, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
व्हीएस न्यूज - दरवर्षी १ जानेवारीला भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी येतात. आजपर्यंत तिथे कधी संघर्ष झाला नाही. साहजिकच तिथे २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उपस्थिती जास्त असेल याची प्रशासनालाही कल्पना होती. योग्य ती काळजी अशावेळी तिथे घेण्याची गरज होती. या घटनेला आता कोणताच रंग देऊन प्रकरण वाढवू नये. घडलेला प्रकार चांगला नाही. सर्वांनी शांतता बाळगावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शरद पवार यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना समाजातील सर्व स्तरातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, मी वढू गावातील लोकांशी या घटनेविषयी संवाद साधला असून येथे पुणे शहरातून आलेल्या हिंदूत्ववादी संघटनांनी येऊन चिथावणी दिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. बाहेरून आलेले लोक येथे गोंधळ करून गेले. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पण स्थानिक लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेशी ज्या लोकांचा काहीएक संबंध नाही. त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून गावात गर्दी होती. यावेळी लोकांना येथे येण्याचे आवाहन २०० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे करण्यात आले होते. त्यामुळे गर्दी जास्त होणार याची सर्वांनाच कल्पना होती. येथील वातावरणात दोन दिवसांपासून अस्वस्थता होती. त्यामुळे योग्य ती दक्षता घेण्याची गरज होती. ही परिस्थिती ती न घेतल्यानेच उद्धवल्याचे पवार म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील एक दलितेतर तरूण कालच्या घटनेत मृत्यूमुखी पडला. ही गोष्ट चिघळू नये याची पोलिसांनी योग्य काळजी घेतली, हे चांगले झाले. या घटनेच्या तळापर्यंत पोलिसांनी जावे. याची चौकशी राज्य सरकारनेही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
व्हीएस न्यूज - इंडियन मेडिकल असोसिएशनशी निगडीत देशभरातील सुमारे ३ लाख डॉक्टर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याच्या सरकारच्या नव्या प्रस्तावाविरोधात संपावर जाणार असल्यामुळे खासगी व सरकारी रूग्णालयातील ओपीडी ठप्प राहणार असल्यामुळे रूग्णांचे मोठे हाल होणार आहेत.
सरकार आज संसदेत या आयोगासाठी विधेयक आणणार असून हे विधेयक जर संमत झाले तर वैद्यकीय इतिहासातील हा काळा दिवस असेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उपचार या विधेयकामुळे महाग होतील आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळेल. वैद्यकीय महाविद्यालयांवर सरकारचे नियंत्रण हे विधेयक लागू झाल्यास मजबूत होईल, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात येते. आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. आप्तकालीन सेवा मात्र बाधीत होणार नाही.
इंडियन मेडिकल कौन्सिलचा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१७ अंतर्गत करण्यात येणाऱ्या तरतुदींना विरोध असून नव्या विधेयकानुसार आतापर्यंत खासगी वैद्यकीय महाविद्यालयात १५ टक्के जागांवरील शूल्क व्यवस्थापन ठरवत. पण आता व्यवस्थापनाला नव्या विधेयकानुसार ६० टक्के जागांचे शूल्क निश्चित करण्याचा अधिकार मिळेल.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002