Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
सज्ञान मुलीला तिच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा अधिकार

व्हीएस न्यूज सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मुलींच्या कपड्यांवर, नोकरीवर आणि वैवाहिक आयुष्यावर निर्बंध लादणाऱ्यांना चपराक लगावली असून सर्वोच्च न्यायालयाने सज्ञान मुलीला तिच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे, असे मत मांडले.

सर्वोच्च न्यायालयात तिरुअनंतरपुरममधील एका महिलेने तिच्या मुलीचा ताबा मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार संबंधित महिलेची १९ वर्षांची मुलगी असून ती तिच्या वडिलांसह कुवेत येथे राहते. पण पतीने माझ्या मुलीवर दबाव टाकल्यामुळेच कुवेतला ती निघून गेल्याचा त्या महिलेने केला होता. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर शुक्रवारी निर्णय दिला. महिलेची मुलगी १९ वर्षांची असून न्यायालयात तिने स्वतः सांगितले होते की तिला कुवेतला वडिलांकडे राहायचे आहे, याकडे खंडपीठाने लक्ष वेधले.

सज्ञान असलेल्या मुलगी किंवा मुलाला त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा अधिकार असून या प्रकरणातील मुलगी सज्ञान असून तिला संविधानाने स्वातंत्र्य दिले असल्यामुळे आई किंवा वडिलांनी यात भावनिक कारण पुढे करुन केलेला हस्तक्षेप अमान्यच असेल, असे न्यायालयाने सांगितले.

...Read More

V. S. News
झुकेरबर्गचे ‘फेसबुक स्वच्छता अभियान’

व्हीएस न्यूज - नवीन वर्षाचा जरा वेगळा संकल्प फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केला आहे. त्यांनी फेसबुकचा दुरुपयोग होण्यापासून रोखण्याचा संकल्प केला आहे. झुकेरबर्ग २००९ पासून नवीन वर्षाचा संकल्प जाहीर करत आहेत. एका पोस्टद्वारे फेसबुकवरच त्यांनी २०१८चा संकल्प जाहीर केला आहे. यंदाचा संकल्प आधीच्या संकल्पांपेक्षा वेगळा आहे.

फेसबुकवरून अमेरिका आणि इतर देशांच्या निवडणुकीत तथाकथित खोट्या बातम्या पसरल्या गेल्या, अशी टीका फेसबुकवर झाली. विशेषत: २०१६मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियाच्या बाबतीत राजकीय जाहिराती फेसबुकवर प्रसिद्ध झाल्या होत्या.

यावर्षीच्या काही ‘महत्त्वाच्या मुद्द्यांची’ यादी झुकेरबर्ग यांनी तयार केली आहे. यावेळी शिवीगाळ आणि द्वेषापासून लोकांना दूर ठेवणे, सरकारकडून होणाऱ्या हस्तक्षेपाविरोधात आवाज उठवणे, तसेच फेसबुकवर घालवलेला वेळ कसा सत्कारणी लावता येईल याचा विचार करणे अशा मुद्द्यांवर विचार होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

...Read More

V. S. News
…आता थेट व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर इंस्टाग्राम स्टोरीज

व्हीएस न्यूज - फेसबुकवरील ग्राहकांचा वापर अधिक सहज व्हावा याकरिता यामध्ये अपडेट्स दिले जात असून इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये आता फेसबुक नवा अपडेट आणण्यासाठी सज्ज झाला आहे.

आजकाल ‘स्टोरीज’ हा नवा आणि इंटरेसटिंग प्रकार खूपच चर्चेमध्ये आहे. हा पर्याय व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक अशा तिन्ही प्लॅटफॉर्ममध्ये आहे. पण यांना आता एकमेकांशी लिंक करण्याचा प्रयत्न फेसबुक करणार आहे. त्यामुळे इंस्टाग्रामची स्टोरी आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवरही स्टेट्समध्ये दिसण्यास शक्य होणार आहे. याबाबत फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार ‘इंस्टाग्राम स्टोरीज’ आणि ‘ व्हॉट्स अ‍ॅप स्टेट्सचा वापर सुमारे ३० कोटी युजर्स करतात. ग्राहकांना स्नॅपचॅटप्रमाणे सुविधा देण्यासाठी फेसबुकने इंस्टाग्रामचा पर्याय आणला. यामध्ये सतत नवनवे अपडेट्स देण्यात आले आहेत. सध्या स्नॅपचॅट युजर्सची संख्या १७.३ कोटी आहे.

फेसबुकचा १२ वर्षाहून लहान असणार्‍या युजर्समध्ये वापर अधिक सुकर बनवण्यासाठी पॅरेंटॅल कंट्रोलचा ऑप्शन देण्यात आला आहे. फेसबुक मेसेंजर अ‍ॅपवरील नियंत्रण यानुसार पालकांकडे राहणार आहे. ६-१२ वयातील मुलांसाठी नवे अ‍ॅप बनवण्यात आले आहे. पालक मुलांची कॉन्टॅक्ट लिस्ट कंट्रोल करू शकणार आहेत.

...Read More

V. S. News
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मितालीने भारतीय पुरुष संघाला प्रशिक्षण देण्याचा विचार करावा- शाहरुख खान.

व्हीएस न्यूज - मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. साखळी फेरीपासून मोठमोठ्या संघांना पराभवाचा धक्का देत मिताली राजच्या टीम इंडियाने सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. यानंतर जगभरातून मितालीच्या नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

मिताली राजने केलेल्या कामगिरीनंतर तिच्याकडून भारतीय क्रीडा रसिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरुखानच्या मते, मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय पुरुष संघाला प्रशिक्षण देण्याचा विचार करावा. स्टार प्लस या वाहिनीवर टेड टॉक या शोमध्ये मितालीशी बोलत असताना शाहरुखने आपलं मत व्यक्त केलं.

शाहरुखने व्यक्त केलेल्या मतावर बोलताना मिताली राज म्हणाली, “मैदानावर असताना मी १०० टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न करते. संपूर्ण संघ मिळून ट्रॉफी कशी जिंकता येईल याकडे माझा भर असतो. आणीबाणीच्या प्रसंगात स्वतःला शांत ठेवण्यासाठी मी म्हणूनच पुस्तक वाचते. त्यामुळे या सर्व गोष्टी मला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करत असल्याचं”, मिताली राज म्हणाली. महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (६१९०) नावावर असलेल्या मिताली राजचा यंदा आयसीसीच्या, महिलांच्या वन-डे संघात समावेश करण्यात आला होता. मिताली राज व्यतिरीक्त एकता बिश्त आणि हरमनप्रीत कौर यांनाही आयसीसीच्या वन-डे संघात स्थान मिळालं आहे.

...Read More

V. S. News
आम्ही एक आहोत आणि एकच राहणार

व्हीएस न्यूज - कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर राज्यभरात तीव्र हिंसक पडसाद उमटले होते. त्यानंतर कोरेगाव भीमामध्ये सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र रहात आहोत आणि यापुढेही राहणार आहोत,अशी भावना व्यक्त केली. एकीची भावना बोलून दाखवित त्यांनी सामाजिक ऐक्याला बाधा आणणाऱ्या प्रवृत्तीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दंगल गावाबाहेरील कार्यकर्त्यांनी व संघटनांनी गावात केल्याचा आरोपही यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये गावातील महिला व मुलींना मारहाण झालेल्यांवर कारवाई करावी, दंगलीतील मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकाला १ कोटींची नुकसान भरपाई करावी, अशी मागणी केली. हा हिंसाचार पोलिसांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नसल्यामुळे झाल्याचा गंभीर आरोप कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सरकारने येथील कार्यक्रमाची कल्पना असूनही हलगर्जीपणा दाखविल्याची टीकाही त्यांनी केली.

जो वाद वढू येथील समाधीवरून झाला त्याचे पडसाद उमटू नये म्हणून कोरेगाव भीमा गाव त्यादिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, असे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोरेगाव भीमाचे नाव नाहक बदनाम झाले आहे. घटनेनंतर ५ दिवस उलटूनही एकही मंत्री गावात फिरकलेला नाही, यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणीतरी येऊन २ समाजात तेढ निर्माण करत आहे, ज्यांनी हे घडवून आणले त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतील गेली ३ दिवस वीज-पाणी नाही. मात्र गावाबाबत खोटे व्हिडिओ व्हायरल केले जात आहे. हे प्रकार थांबवा, असे त्यांनी आवाहन केले आहे.

...Read More

V. S. News
गोव्यात आता सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास बंदी

व्हीएस न्यूज - पुढील महिन्यापासून गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे दंडनीय अपराध ठरणार असल्यामुळे समुद्रकिनारी बसून निवांत दारु पिण्यासाठी गोव्याचा मार्ग धरणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.

या नव्या नियमाची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली असून विशेष म्हणजे हा नियम दारुच्या सेवनामुळे नाही, तर दारुच्या रिकाम्या बाटल्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी करण्यात आला आहे. दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच गोव्यात सार्वजनिक ठिकाणी पडल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची गोवा सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

पर्रिकरांनी ही माहिती पणजीमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्धाटनानंतर दिली. मुख्यमंत्र्यांनी येत्या १५ दिवसात कायद्यात तरतूद करुन त्याची फेब्रुवारी महिन्यापासून कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. गोव्यात डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच पर्यटकांची गर्दी होते. देशाच्या विविध भागातून आणि परदेशातून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेले पर्यटक दारुच्या दुकानांसमोर तसेच बीचवर दारु पिऊन बाटल्या तिकडेच टाकून जात असल्याचे आढळल्यामुळे कचरा उचलून साफ सफाई करण्याचे सरकारी यंत्रणेचे काम वाढले आहे.

...Read More

V. S. News
भीमा-कोरेगाव प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करावी – भिडे गुरुजी

व्हीएस न्यूज - माझ्यावर निराधार आरोप करीत प्रकाश आंबेडकर यांनी अटकेची मागणी केली असून याबाबत भीमा-कोरेगाव प्रकरणाची राज्य शासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे निवेदन शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी दिले आहे.

आपल्या निवेदनात गुरुजींनी म्हटले आहे, की मी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीवेळी उपस्थित होतो व कारणीभूत आहे असे विधान केले आहे. प्रत्यक्षात मी त्या दिवशी सांगली मुक्कामी असताना माझ्यावर हा आरोप त्यांनी केला आहे. याकूब मेमनची वाट मला दाखविण्याची मागणी केली आहे. आसेतू सारा हिंदुस्थान एकरूप करण्याचा प्रयत्न मी व माझे कार्यकर्ते करीत असताना हे करण्यात आलेले आरोप निराधार आहेत. याची शासनाने सखोल चौकशी करावी.

...Read More

V. S. News
शालाबाह्य कामातून शालेय शिक्षकांची होणार सुटका – पंकजा मुंडे

व्हीएस न्यूज: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सिंधुदुर्गातील सोळाव्या प्राथमिक शिक्षक अधिवेशनात शिक्षकांना शाळाबाह्य कामातून लवकरच मुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या शौचालय सर्वेक्षण, निवडणूक आणि इतर शाळाबाह्य शिक्षकांना कामे करावी लागतात. शिक्षकांना ही कामे भविष्यात करावी लागणार नाहीत असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे.

तसेच राज्यातील मराठी शाळांसाठी आयसीएसई आणि सीबीएससी बोर्डाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्कूल बोर्डाची निर्मिती केली जाणार असून यासाठी राज्यातील शंभर शाळा पहिल्या टप्प्यात निवडण्यात आल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे ग्रामीण भागातल्या हुशार मराठी विद्यार्थ्यांनाही आंतराष्ट्रीय ज्ञान मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच तावडे म्हणाले आहेत. तावडे सिंधुदुर्गात झालेल्या प्राथमिक शिक्षक अधिवेशनात बोलत होते.

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी शिक्षकांना अधिवेशनाला सिंधुदुर्गात आला असाल तर परत जाताना जवळ असलेल्या गोव्याला जरूर जा पण चुकीचे काही करु नका असा सल्ला दिला आहे. तर गोव्यात जाणाऱ्या शिक्षकांनी आपल्या ड्रायव्हरला सावध ठेवण्यास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नारायण राणे यांनी वर्गात मुलांवर चांगले संस्कार करण्याची अपेक्षा असलेल्या शिक्षकांबाबत चांगले ऐकू येत नसल्याचे सांगत शिक्षकांना उपदेशाचे डोसही पाजले आहेत.

...Read More

V. S. News
‘चिकू’ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

व्हीएस न्यूज - आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली बनला आहे. आयपीएलचे सामने विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू या संघातून खेळतो. विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने आयपीएलसाठी १७ कोटी रूपये दिले आहेत. कर्णधार कोहलीला टीममध्ये कायम ठेवण्यात आयपीएल २०१८च्या रिटेन डेडलाइन वर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने कुठलीही कसर सोडली नाही. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसोबत खेळायचे १७ कोटी रूपये घेऊन रायझिंग पुणे सुपरजायंट्सने १४.५ कोटी देऊन विकत घेतलेल्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे टाकले आहे. १७ कोटी रूपये देऊन विराट कोहलीला रिटेन करण्यात आले आहे. बेन स्टोक्सला मागे टाकण्यात विराट कोहलीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्र सिंह धोनी आणि मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माचा सहभाग आहे. धोनी व रोहित शर्माला त्यांच्या टीमने १५ कोटी रूपयात रिटेन केले आहे.

खेळाडूंना रिटेन करण्यावरून बरीच चर्चा रंगली होती, पण ज्या खेळाडुंची जास्त चर्चा होती त्याच खेळाडूंना संघामध्ये घेण्यात आले आहे. २०१८च्या नव्या सीझनसाठी निवडलेल्या आपल्या खेळाडूंची यादी सर्व आयपीएल संघांनी जाहीर केली आहे. खेळाडूंची ही यादी जाहीर करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती. आता यानंतर २७ आणि २८ जानेवारी रोजी आयपीएलची बोली लागणार आहे. यंदा ४ ते २७ एप्रिलदरम्यान आयपीएल स्पर्धा होणार आहे.

आयपीएलच्या ११व्या सीजनसाठी संघाने कायम न ठेवलेल्या खेळांडूंमध्ये गौतम गंभीरचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची चेन्नईच्या संघात वापसी झाली आहे. स्टीव स्मिथला राजस्थान रॉयल्सच्या संघाने घेतले आहे. तर रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि बुमराह यांना मुंबई इंडियन्सच्या संघाने कायम ठेवले आहे. तीन-तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय चेन्नई, बंगळूरु, दिल्ली आणि मुंबईच्या संघांनी घेतला आहे. तर हैदराबाद आणि कोलकाताच्या संघाने प्रत्येकी दोन खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तसेच पंजाब आणि राजस्थानच्या संघाने प्रत्येकी एका खेळाडूला आपापल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

...Read More

V. S. News
मुख्यमंत्र्यांच्या फेक फेसबुकवर शरद पवारांची बदनामी

व्हीएस न्यूज: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बोगस फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी सुरु असून आम्ही संबंधितांविरुद्ध न्यायालयीन कारवाई करूच, परंतु यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांचे देश आणि महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये मोठे योगदान असून जेव्हा राष्ट्रीय पातळीवर समस्या निर्माण होतात पवारांचा सल्ला त्या-त्यावेळी घेतला जातो. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती आली त्यावेळी पवारांवर जबाबदारी सोपवली होती. या देशात दुसरी कृषीक्रांती घडवण्याचे काम माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली पवार यांनी केले, असेही ते म्हणाले.

आ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटून देशहितासाठी शरद पवार यांच्यासारख्यांची हत्या केली, तरी पाप लागणार नाही, अशी पोस्ट टाकणा-या माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. संध्याकाळी आरोपीवर उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. अशा पद्धतीची घाणेरडी पोस्ट मी माझ्या राजकीय जीवनात पाहिलेली नाही. अशा लोकांवर कारवाई करावी, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.

...Read More

V. S. News
लग्नापूर्वी गप्पा मारल्यामुळे भावी वधू-वराचा खून!

व्हीएस न्यूज - लग्न होण्यापूर्वी एकमेकांशी गप्पा मारणाऱ्या एका तरुणीचा व तिच्या वाग्दत्त वराचा खून केल्याची घटना पाकिस्तानात घडली आहे. या दोघांना एका उद्यानात गप्पा मारताना मुलीच्या काकाने पाहिले होते. ऑनर किलिंगची ही ताजी घटना असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

सिंध प्रांतातील नयी वाही गावात ही घटना घडली. नझीरन असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून शाहीद या तिच्या भावी नवऱ्यासोबत ती गप्पा मारत होती. या दोघांना पाहून तिच्या काकाचा राग अनावर झाला, असे एक्स्प्रेस न्यूज या वृत्तपत्राने म्हटले आहे. या प्रकरणी मुलीच्या दोन काकांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

ऑनर किलिंगच्या घटना पाकिस्तानात सर्रास घडत असून त्यातील बहुतांश घटनांत महिलांचा बळी जातो. गेल्या एका दशकात दरवर्षी सरासरी 650 ऑनर किलिंग होतात, असे पाकिस्तानच्या मानव हक्क आयोगाने (एचआरसीपी) आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक घटना पोलिसांपर्यंत पोचत नसल्याने खरा आकडा खूप अधिक असल्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. पाकिस्तानात दहशतवादात बळी पडणाऱ्या नागरिकांपेक्षा तथाकथित अनैतिक वागणुकीबद्दल जवळच्या कुटुंबियांच्या हातून अधिक महिला बळी पडतात, असेही या अहवालात म्हटले आहे.

...Read More

V. S. News
बिना कार्ड, बिना पिन काम करणारे येस बँकेचे एटीएम

व्हीएस न्यूज - खासगी क्षेत्रातील येस बँकेने असे एटीएम वापरात आणले आहे ज्यासाठी ग्राहकाला डेबिट कार्ड अथवा पिन नंबरची आवश्यकता राहणार नाही.यासाठी बँकेने फिनटेक क्षेत्रातील स्टार्टअप नियरबाय टेक्नॉलॉजीबरोबर करार केला आहे. त्यानुसार बँकेला आधार आधारित एटीएम उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याच्या माध्यमातून ग्राहक रिटेलर्स कडे पैसे जमा करणे, पैसे काढणे अशी सेवा घेऊ शकणार आहे.

स्मार्टफोनचा वापर करून कुणीही रिटेलर- ग्राहक आधार एटीएम, आधार बँक शाखा स्वरूपात वापरू शकणार आहे. त्यासाठी येस बँकेने नॅशनल पेमेंट कार्पोरेशनसह काम केले असून देशभरात ४० हजार टच पॉईंट दिले जाणार आहेत. या टच पॉईटवरून ग्राहक आधार नंबर व बोटांचे ठसे देऊन रोख काढणे, भरणे वा अन्य आर्थिक देवघेवीचे व्यवहार करू शकतील असे समजते. यासाठी रिटेलर्स ऑफ इंडिया बरोबरही बँकेने करार केला आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!