Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
बलात्कार प्रकरणातील आरोपीला मटणाच्या पार्टीची शिक्षा

व्हीएस न्यूज - गडचिरोलीतील धानोरा तालुक्यात बलात्कार प्रकरणातील आरोपीला जातपंचायतीने गावाला मटणाची पार्टी देण्याचा दंड सुनावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जातपंचायतीच्या पाच जणांना अटक केली असून राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

धानोरा तालुक्यातील मोहली येथे राहणाऱ्या पाचवीतील मुलीवीर अनिल मडवी या नराधमाने बलात्कार केला होता. नराधमाने पीडित मुलीला घरी सोडतो असे सांगत तिला निर्जनस्थळी नेले. यानंतर तिच्यावर बलात्कार केला. घरी परतल्यावर मुलीने आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. आई-वडिलांनी पोलिसांकडे जाण्याऐवजी हे प्रकरण जातपंचायतीकडे नेले. जातपंचायतीने अनिलला गावाला मटण पार्टी देण्याचा आणि पीडित मुलीला उपचारासाठी १२ हजार रुपये देण्याचा दंड सुनावला. तिकडे उपचार न मिळाल्याने पीडित मुलीची प्रकृती खालावली. आई- वडिलांनी हे प्रकरण पुन्हा जात पंचायतीसमोर आणले. जातपंचायतीच्या पंचांनी आई-वडिलांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला.

आई- वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीवर कारवाई झाली. या प्रकरणात जातपंचायतीचाही सहभाग असल्याचे भूमकाल संघटनेने उघड केले. पीडितेवर अन्याय करणाऱ्या जातपंचायतीवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली. आता पोलिसांनी जात पंचायतीच्या पाच पंचांना अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.

...Read More

V. S. News
सिंचन घोटाळा प्रकरण; न्यायालयाने दिले अजित पवारांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

व्हीएस न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि माजी आमदार संदिप बजोरीया यांच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अडचणी वाढण्याची शक्यता असून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज पुन्हा सिंचन कंत्राटाच्या अनियमितता प्रकरणात अजित पवार आणि संदिप बजोरीया यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश दिला आहे.

सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांची चौकशी का नाही? अशी परखड मौखीक विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी केली होती. तसेच त्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी झाली, यावेळी सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार आणि संदिप बजोरिया यांचे संगनमत आहे की नाही, याबाबत एकाही शपथपत्रात स्पष्टता नसल्याचे सांगत या घोटाळ्याची ही चौकशी संशयास्पद असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

अमरावती जिल्ह्यातील जिगाव, निम्नपेढी, भातुकली आणि वाघाडी सिंचन प्रकल्पांचे कंत्राट बजोरीया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. या कंपंनीने बोगस कागदपत्र सादर करुन कंत्राट घेतल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. या घोटाळ्यात अजित पवार यांच्या राजकीय लाभातून हे कंत्राट बजोरीया कंपनीला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत नागपूर खंडपीठात ४ जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर बुधवारी आणि गुरुवारी सुनावणी झाली. या सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे, त्यांनी आतापर्यंत केलेला तपास, आणि अजित पवार, संदिप बजोरीया यांच्यावरील सरकारची भुमिका, याबाबत २ आठवड्यात शपथपत्र सादर करण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

...Read More

V. S. News
जमीन खरेदी करण्यासाठी फिरत आहेत शिवसेनेचे दलाल

व्हीएस न्यूज - शिवसेनेचे दलाल नाणार प्रकल्पाजवळील जमीन खरेदी करण्यासाठी फिरत असून येथील जनतेला या प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उल्लू बनवत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजापूरमधील कात्रादेवी येथील सभेत बोलताना केला.

राणे म्हणाले, की नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याचे सिद्ध करुन दाखवा, राजकीय जीवनातून मी निवृत्त होईल, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे. मोदी-अमित शहा यांनी हा प्रकल्प आणला, असे खासदार विनायक राऊत सांगतात. पण नाणार कुठे आहे, हे त्या दोघांना माहीत तरी आहे का ? विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आंध्रमध्ये हा प्रकल्प जात होता, तो याच विनायक राऊत यांनी राजापुरात आणला. शिवसेनेला कोकणाने २४ आमदार दिले. पण कोकणाला शिवसेनेने काय दिले? शिवसेना नारायण राणे यांना घाबरते. हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.

प्रकल्पाला रामदास कदम यांचा विरोध आहे, तर मग प्रकल्पाला पर्यावरणाचा दाखला कोणी दिला, असा सवालही त्यांनी केला. थापा मारण्याचे काम उद्योगमंत्री सुभाष देसाई करत आहेत, तर या प्रकल्पावरुन जनतेला उद्धव ठाकरे उल्लू बनवण्याचे काम करत आहेत. १५ दिवसात प्रकल्प रद्द करण्याची भाषा शिवसेनेने केली होती. त्याचे काय झाले असा सवालदेखील राणेंनी यावेळी केला. न्याय मिळेपर्यंत नाणारच्या जनतेसोबत असेन, तुम्ही अशीच एकजूट दाखवा. माझा प्रकल्पाला शंभर टक्के विरोधच असणार असल्याची घोषणा यावेळी नारायण राणेंनी केली.

हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असे सांगत यासाठी आंदोलनाचे नेतृत्व आपण स्वतः करणार असल्याची हमी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली. आपण सरकारकडे या रिफायनरी प्रकल्पाविरोधात दाद मागणार मागणार असून, या प्रकल्पाच्या विरोधातील सर्व मुद्दे घेवून आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या या जाहीर सभेला काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

...Read More

V. S. News
नरेंद्र मोदी कुणाचेच ऐकून घेत नाहीत – राजेंद्रसिंह

व्हीएस न्यूज विरोधकांचेही म्हणणे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ऐकून घेत होते. पण नरेंद्र मोदी कुणाचोच ऐकून घेत नाहीत, असा गंभीर आरोप पाणीवाले बाबा म्हणजेच राजेंद्रसिंह यांनी अहमदनगरला जलसाक्षरता कार्यशाळेच्या वेळी केला आहे.

२० हजार कोटींची तरतूद मोदींनी स्वच्छ गंगा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी केली. पण त्यातील २ टक्केही खर्च करु शकले नाहीत. फार मोठे काम मोदी करतील असे वाटत होते. परंतु त्यांनी सपशेल निराशा केली असल्याचे स्पष्ट मत सिंह यांनी यावेळी मांडले आहे. सिंह यांनी नदीजोड प्रकल्पावरून नाराजी व्यक्त केली. देशाला सध्याच्या नदीजोड प्रकल्पामुळे मोठा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. वाजपेयींना समजाऊ शकत होतो. ते मोठ्या मनाचे आणि विरोधकांचे म्हणणे ऐकून घेणारे होते. मात्र मोदी ऐकतच नसल्याचे सिंह यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
मंत्रालयात महिन्याभरात तिसरी आत्महत्या

व्हीएस न्यूज मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्यांनंतर त्रिमूर्ती आवारातून पडलेल्या हर्षल रावतेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयात त्या तरुणाला नेण्यात आले. पण डोक्याला जबर मुका मार बसलेल्या हर्षलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ह्या घटनेची माहिती मिळताच मंत्रालयात येऊन घटनेची माहिती घेतली. पाटील यांनी यावेळी मंत्रालय सुसाईड पॉईंट झाला आहे का​ ​? महिनाभरात आत्महत्येच्या प्रयत्नाची ही तिसरी घटना आहे. नेमकी ही घटना का घडली, याचा खुलासा सरकारने करावा​, अशी मागणी केली. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्रालयाकडे जनता न्याय मिळेल या आशेने पाहत असते, पण जनतेला न्याय मिळत नाही. ​अशा घटना वारंवार घडणे हे सरकारसाठी भूषणावह नाही,​ या शब्दात सरकारवर टीका केली.

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची घटना कळताच घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मंत्रालयात वारंवार आत्महत्येच्या प्रयत्नांच्या घटना घडत आहेत, याचा अर्थ जनता त्रस्त आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला हवा,​ अशी मागणी​ पृथ्वीराज चव्हाण​ यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. ​

तावडे यांनी या घटनेबाबत अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, पैठण तुरुंगात हर्षल रावते हा खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता. तो तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. त्याने २००३ साली त्याच्या मेव्हणीची हत्या केली होती. तो २०१४ पासून पैठण तुरुंगात शिक्षा भोगत होता. तसेच त्याने आत्महत्या केली की हा अपघात आहे, याचा तपास पोलीस करत असल्याचेही तावडे यांनी सांगितले होते.

...Read More

V. S. News
मोदी सरकारचा राफेल करार काँग्रेसपेक्षा २,२६८ कोटी रुपयांनी स्वस्त

व्हीएस न्यूज - राफेल विमान खरेदीविषयक सौदा उघड करण्याच्या कारणावरून देशात वादळ निर्माण झाले आहे. काँग्रेस याप्रश्नी कमालीची आक्रमक झाली असून मोदी सरकारने ही विमाने खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजलेत हे जाहीर करावे अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत एनडीए सरकारने राफेल विमान खरेदीच्या सौद्याची माहिती देण्यास नकार दिला आहे. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकारने केलेल्या करारानुसार एका राफेल लढाऊ विमानासाठी ९१ दशलक्ष युरो किंवा ७१७ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. हा ३६ विमानांचा करार असून एकूण २५,८१२ कोटी रुपये भारताला मोजावे लागणार आहेत. तर, यूपीए सरकारच्या करारानुसार एका विमानासाठी ९९ दशलक्ष युरो किंवा ७८० कोटी रुपये मोजावे लागणार होते. त्यामुळे नवीन करारानुसार प्रति राफेल विमान ६३ कोटी रुपये वाचणार आहेत. एकूण ३६ विमानांच्या खरेदीचा विचार करता भारताची नवीन करारामुळे २,२६८ कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘इंडिया टुडे’ने सूत्रांचा हवाला देत यासंबंधीचे वृत्त दिले आहे. ‘इंडिया टुडे’ने विविध सूत्रांबरोबर चर्चा करून राफेल विमान सौद्याबाबत माहिती मिळवली. शस्त्रे, सुटे भाग आणि देखभाल खर्चासह ३६ लढाऊ विमानांसाठी २५,८१२ कोटी रुपये खर्च येणार आहे. यूपीए सरकारने केलेला करार कायम ठेवला असता तर सरकारला यासाठी २८,०८० कोटी रूपये द्यावे लागले असते, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली. मोदी सरकारने वर्ष २०१५ मध्ये यूपीएचा १२६ विमानांचा करार रद्द केला आणि ३६ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यूपीए सरकारने केलेल्या करारात अनेक विसंगती होत्या.

उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बेंच मार्क किंमतीचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु, अशा निर्णयांना आक्षेप घेणे हा सरकारी प्रक्रियेतील एका भाग असल्याचे एका सूत्राने सांगितले. यूपीएने केलेल्या करारात हिंदुस्तान ऍरोनॉटिकलला तंत्रज्ञान हस्तांतरण करार झाला होता. पण मेटोर मिसाईलचे सुटे भाग आणि देखरेखीचा या करारात समावेश नव्हता. दरम्यान, राफेल विमान खरेदीविषयक सौदा उघड करण्याची काँग्रेसची मागणी म्हणजे देशाच्या सुरक्षेशी गंभीर तडजोड ठरेल, अशी टीका करीत ही मागणी करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकेकाळी संरक्षणमंत्रीपद भूषविलेले प्रणब मुखर्जी यांच्याकडून ज्ञान घ्यावे, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना गुरुवारी लगावला होता. गेली चार वर्षे आमचे सरकार भ्रष्टाचारमुक्त आहे. त्यामुळे या करारात भ्रष्टाचार झाल्याचे फसवे ढोल बडवले जात आहेत, अशी टीकाही जेटली यांनी केली. तुम्ही संरक्षण करार जाहीर करता तेव्हा नुसती त्या अस्त्रांची किंमतच जाहीर करीत नाही, तर त्या अस्त्रांची संहारकक्षमताही उघड होते, असे जेटली म्हणाले.

...Read More

V. S. News
राहुल आता माझेही ‘बॉस’ – सोनिया गांधी

व्हीएस न्यूज - काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने राहुल गांधी हे आता माझेही ‘बॉस’ आहेत, असे सांगत पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पक्षातील ज्येष्ठांना राहुल यांचे ऐकावे असा संदेश दिला. पक्षाच्या भवितव्याच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी आपण समविचारी पक्षांसमवेत काम करणार असल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढविला. संकुचित राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजाचे ध्रुवीकरण करून सरकार अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार घडवीत असल्याचा आरोपही सोनिया गांधी यांनी केला.

पक्षाच्या खासदारांनी समर्पित भावनेने, निष्ठेने राहुल गांधी यांच्यासमवेत काम करावे आणि पक्ष मजबूत करावा, असे आवाहनही सोनिया गांधी यांनी केले. आपण पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड केली आहे, त्यांना तुमच्या वतीने आणि आपल्या वतीने शुभेच्छा देत असल्याचे सोनिया म्हणाल्या. राहुल गांधी आता आपलेही बॉस आहेत, त्याबद्दल कोणाच्याही मनात संशय असण्याचे कारण नाही. आपण सर्व जण राहुल यांच्यासमवेतही तेवढय़ात समर्पित भावनेने काम कराल, अशी अपेक्षा असल्याचेही सोनिया म्हणाल्या.

मोदी सरकार हे वास्तवाशी समक्रमित नाही आणि पंतप्रधानांनी लोकसभेत बुधवारी केलेल्या भाषणावरूनच ते स्पष्ट होत आहे, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा या नात्याने आपण पक्षाचे अध्यक्ष आणि अन्य सहकारी यांच्याशी सल्लामसलत करून काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला भीती दाखविण्याचा जो कोणी प्रयत्न करेल. त्याने अमेरिकी लष्करी बळाकडे दुर्लक्ष करू नये, असेही पेन्स यावेळी म्हणाले. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहोत, असेही ते म्हणाले. अमेरिका आणि जपानचे लष्कर या दोन्ही देशांतील नागरिकांच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी कोणालाही आव्हान देण्यास सज्ज आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्हाला कोणी आण्विक शस्त्रांची भीती दाखविणार असेल तर त्यांना त्याच प्रकारे उत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले. बुधवारीच पेन्स यांनी उत्तर कोरियावर कठोर र्निबध लादण्याचे संकेत दिले होते.

...Read More

V. S. News
पाकिस्तानात ‘पद्मावत’मधील ‘खिलजी’वरून वाद

व्हीएस न्यूज - सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’वरून भारतात रंगलेला वाद थांबला असतानाच आता पाकिस्तानातही ‘पद्मावत’वरून वाद निर्माण झाला आहे. या सिनेमात अल्लाउद्दीन खिलजीला खलनायक दाखवून मुसलमानांची प्रतिमा चुकीची रंगविल्याने या सिनेमावर बंदी घालण्यात यावी,अशी मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

सेन्सॉर बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर दोन आठवडय़ांपूर्वी ‘पद्मावत’ पाकिस्तानात झळकला. मात्र, या सिनेमात मुसलमानांची प्रतिमा चुकीची रंगवल्याचा आरोप करण्यात आल्याने हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. लाहोर न्यायालयाने याचिका दाखल करून घेत पंजाब सेन्सॉर बोर्डाला या सिनेमाचे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सिनेमाचं पुनरावलोकन करण्यासाठी बोर्डाने बैठकीचं आयोजन केलं आहे. तशी पत्रही सदस्यांना पाठविण्यात आली आहेत.

‘पद्मावत’मधील दृश्य आणि संवाद ऐकून नंतरच सिनेमावरील बंदीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या आधी भारतातही ‘पद्मावत’ला विरोध करण्यात आला होता. गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरयाणा या चार राज्यात या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये म्हणून ठिकठिकाणी जाळपोळही करण्यात आली होती.

...Read More

V. S. News
झुलन गोस्वामी २०० विकेट घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू

व्हीएस न्यूज - भारतीय महिला क्रिकेट टीम मधील वेगवान गोलंदाज ३५ वर्षीय झुलन गोस्वामी हिने तिच्या करियरचा १६६ वा सामना खेळत अस्तात्ना एक दिवसीय सामन्यात २०० विकेट घेऊन विश्वविक्रम नोंदविला आहे. असा विक्रम करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. भारत व द.आफ्रिका याच्यात सुरु असलेल्या आयसीसी महिला चँपियनशिप साठीच्या तीन सामन्याच्या मालिकेत झुलनने द.आफ्रिकेची सलामी फलंदाज लारा वूलवार्तची विकेट घेऊन हा विक्रम नोंदविला आहे. या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे.

झुलनने २००२ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून २००७ मध्ये ती आयसीसीची सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटर म्हणून निवडली गेली होती. २०१७ सालातील ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली आहे. एक दिवसीय सामन्यात भारतासाठी २०० विकेट घेण्याची कामगिरी कपिल देव याने सर्वप्रथम १९९१ साली नोंदविली आहे.

...Read More

V. S. News
भाजपच्या काळात मंत्रालयाचे ‘आत्महत्यालय’ – राज ठाकरे

व्हीएस न्यूज – निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपचे नेते उच्चारवाने आमचे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारपेक्षा वेगळे असेल,असे सांगत असत आणि खरोखरच आघाडी सरकारपेक्षा हे सरकार वेगळे आहे. मंत्रालयाचे भाजप सरकारच्या काळात ‘आत्महत्यालय’बनले असल्याची घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा एका तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. आपल्या शेतात आज शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि आत्महत्येसाठी ते आता मंत्रालयाच्या दारातही येत आहेत. मंत्रालयाच्या दारात गेल्या तीन वर्षांत आत्महत्या करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेतल्यास भाजप सरकार काँग्रेसपेक्षा कितीतरी भयानक म्हणावे लागेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

बेरोजगार तरुणांनी, शेतकऱ्यांनी तसेच अन्यायग्रस्त लोकांनी गेल्या तीन वर्षांत मंत्रालयामध्ये न्याय मिळण्यासाठी उंबरठे झिजवले. पण आपल्याला मंत्रालयाच्या दारातही न्याय मिळणार नसल्याचे दिसून आल्यानंतर अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मंत्रालयात धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर काँग्रेसच्या काळातील त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचे प्रकरण असल्याचे सांगण्याचा निर्लज्जपणा दाखविण्यात आला. भाजप गेले तीन वर्षे सत्तेत आहे मग धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्यायला भाजप सरकारमधील मंत्र्यांना कोणी रोखले होते, असा सवाल राज यांनी केला.

मंत्रालयाच्या दारात अधिवेशन सुरू असताना धर्मा पाटील यांच्या आत्महत्येपूर्वीही मार्च २०१६ मध्ये माधव कदम यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. राजू आंगळे या तरुणाने त्याच वर्षी नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अलीकडेच एका तरुणाने मंत्रालयात सहाव्या मजल्याच्या सज्जावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावर जागोजागी जाळ्या बसविण्याचा विचार सुरू झाला. जाळ्या बसविण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवले तर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही, असे राज यांनी स्पष्ट केले.

...Read More

V. S. News
काश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला

व्हीएस न्यूज गंभीर संकटात देश असताना पकोडे- भजी या चर्चेत सर्वांना गुंतवून ठेवायचे आणि जवानांनी काश्मीरात रोज शहीद व्हायचे. सत्तेत येऊन मोदी सरकारला चार वर्षे झाली असून उकळत्या तेलातच काश्मीर प्रश्नाचा पकोडा फुटला, अशा शब्दात शिवसेनेने भाजपला फटकारले आहे.

काश्मीर प्रश्नावरुन मोदी सरकारवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. जगात पाकिस्तानला एकाकी पाडल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. पण भारताची साडी पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी काश्मीरमध्ये रोज सोडत असल्यामुळेच तिरंग्यास मान खाली घालावी लागते, असे शिवसेनेने म्हटले आहे.

हाताबाहेर जम्मू- काश्मीरमधील परिस्थिती गेली असून दिल्लीच्या धमक्या पोकळ ठरवल्या जात आहे. या बलाढ्य देशाला सीमेवरील घटना मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. पकोडे व भजी तळण्यावर देशात राजकीय चर्चा सुरु आहे. सरकारच्या वतीने पाकला चोख उत्तर देऊ असे रोज सांगितले जाते. मग सरकारला अजून उत्तर सापडत नाही का?, दहशतवाद्यांसमोर काँग्रेसने गुडघे टेकल्याचा आरोप करणाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत पाकड्यांचे गुडघे फोडले का?, दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले का?, असे प्रश्नच शिवसेनेने सरकारला विचारले आहेत. देशातील गंभीर प्रश्नांवरून लक्ष उडावे यासाठी वैचारिक पकोड्यांचे तळणे सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पाकिस्तानचा पराभव करून इंदिरा गांधी यांनी फाळणी केली. अमेरिका त्यावेळी भारताविरोधात पाकच्या बाजूने होती. आता अमेरिकेसह बहुसंख्य देश मोदींच्या तालावर नाचतात असे सांगितले जाते. पण परिस्थितीत अजूनही फरक पडलेला नाही, असे शिवसेनेने नमूद केले.

...Read More

V. S. News
शरद पवारांवर आक्षेपार्ह ट्विट करणार अटकेत

व्हीएस न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी साराच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट उघडून आक्षेपार्ह ट्विट केल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले होते. याप्रकरणी सायबर पोलिसांनी नितीन आत्माराम सिसोदे (वय ३९) याला अटक केली आहे. अंधेरी येथील लोकसरिता अर्पाटमेंटमधील फ्लॅटमधून नितीन सिसोदेला पोलिसांनी अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीनने सुमारे पाच महिन्यांपूर्वी गुगलवरून साराचा फोटो डाऊनलोड केला. त्यानंतर तिच्या नावाने एक बनावट ट्विटर अकाऊंटही सुरू केले. त्याचबरोबर याच बनावट अकाऊंटवरून त्याने ९ ऑक्टोबर २०१७ रोजी एक ट्विट केले,शरद पवार यांच्याविषयी यामध्ये आक्षेपार्ह लिहिले होते. दरम्यान, त्या कालावधीत सारा ही लंडनमध्ये होती, त्यामुळे सचिनच्या सचिवाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

ट्विटर अकाऊंट ज्या मोबाइलवरून काढण्यात आला होता, त्या मोबाइलचा आयएमइआय क्रमांक पोलिसांनी मंगळवारी शोधला. त्यांनी त्यावरून इंटरनेट पोट्रोकॉल (आयपी) अॅड्रेसही शोधला. पोलीस आयपी अॅड्रेसवरून नितीनच्या घरी पोहोचले. अटकेनंतर नितीनला किल्ला न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!