Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचेच नाव

व्हिएस न्यूज - सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. तसेच पुढील कार्यवाहीसाठी उपसमिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी विधानसभेत सांगितले.

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी धनगर समाजाकडून होत होती, तर सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वराचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाकडून होत होती. मात्र, याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोलापूर विद्यापीठाला कोणाचेही नाव देण्याचा निर्णय झाला नसल्याचे जाहीर केले होते. दोन समाजात तेढ वाढत असल्याने याबाबत सरकारी पातळीवरून वेगवेगळी विधाने केली जात होती.

मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांचे नाव दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतरही विनोद तावडे यांनी अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती या अधिवेशनादरम्यान दिली होती. अखेर यासंदर्भात विरोधकांनी व धनगर समाजातील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेचे काय झाले, असा प्रश्न लावून धरला.

त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नागपूरमध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीत सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांचे नाव देण्याचा निर्णय झाल्याची माहिती दिली. तसेच त्यासाठीच्या पुढील कार्यवाहीसाठी एक उपसमिती स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.
...Read More

V. S. News
आधार क्रमांकाचा गैरवापर प्रकरणावरुन ‘एअरटेल’च्या सीईओचा राजीनामा

व्हिएस न्यूज - आधार क्रमांकाचा गैरवापर प्रकरणावरुन एअरटेल पेमेंट बँकेचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक शशी अरोरा यांनी राजीनामा दिला आहे.

इंडियन युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (यूआयडीएआय) ने १६ डिसेंबरला कंपनीच्या ई-केवायसी परवान्याला तात्पुरते निलंबित केले आहे. एअरटेल आणि एअरटेल पेमेंट्स या दोन्ही बँकांचा परवाना यूआयडीएआयने निलंबित केला होता, पण प्राधिकरणाने गुरुवारी काही अटींनुसार १० जानेवारीपर्यंत एअरटेला ई-केवायसीच्या पडताळणीसाठी मान्यता दिली आहे. पण पेमेंट्स बँकेचा ई-केवायसी पडताळणीचा परवाना अजुनपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.

शशी अरोरा यांनी २००६ पासून पेमेंट बँकेचे नेतृत्व केले आहे. त्यावेळीपासून ते कंपनीत कार्यरत आहेत. एअरटेलसाठी त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. कंपनीच्या विकासामध्ये त्यांनी लक्षणीय योगदान दिल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या डीटीएच व्यवसायाला त्यांनी मजबूत केले आहे. शशी अरोरा यांनी आता कंपनी सोडली आहे. त्यांना आम्ही त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो, असे देखील कंपनीने म्हटले आहे.
...Read More

V. S. News
२६ फेब्रुवारीला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

व्हिएस न्यूज - शुक्रवारी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले असून बोंडअळी, ओखी वादळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत तसेच काही मंत्र्यांच्या गैरकारभाराच्या मुद्दावरुन दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.

विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात घातलेल्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकले नाही. एकूण १९ विधेयके या अधिवेशनामध्ये विधानसभेत संमत करण्यात आली, यापैकी ११ विधेयके दोन्ही सभागृहात मिळून संमत करण्यात आली. तसेच एकूण ९२४५ तारांकित प्रश्न प्राप्त झाले.

हिवाळी अधिवेशनात प्राप्त झालेल्या २७६८ लक्षवेधी सूचनांमधून १२९ लक्षवेधी सूचना स्वीकृत झाल्या. त्यामधील ३७ लक्षवेधींवर सभागृहात चर्चा करण्यात आली. अधिवेशन काळात दहा १० दिवसात प्रत्यक्षात ६९ तास ५७ मिनिटे कामकाज झाले. यापैकी विरोधकांच्या गोंधळाने ४ तास २६ मिनिटे कामकाज होऊ शकले नाही. रोज सरासरी ७ तास ४६ मिनिटे कामकाज झाले, असे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.

बोंडअळी, ओखी वादळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत व काही मंत्र्यांच्या गैरकारभाराचा मुद्दा विधानसभा व विधानपरिषदेत उपस्थित करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. तसेच विरोधकांनी मराठा, मुस्लीम आणि धनगर आरक्षणाच्या मुद्यावर ही सरकारला धारेवर धरले. विरोधकांनी दोन्ही सभागृहात कोकणातील रिफायनरीवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेच्या नेत्यांमुळेच हा प्रकल्प कोकणात आल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी नव्या वादाला तोंड फोडले. तसेच याच अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वारंवार सरकारला धारेवर धरून विरोधकांची भूमिका बजावली तर आशिष देशमुख यांनी भाजपला घरचा आहेर देऊन बंडाचे संकेत दिले.
...Read More

V. S. News
राजस्थानमध्ये बस नदीत कोसळली, ३० जणांना जलसमाधी

व्हिएस न्यूज -आज सकाळी एक प्रवासी राजस्थानमध्ये बस नदीत कोसळून झालेल्या अपघातमध्ये ३० प्रवाशी ठार झाले आहेत. सवाईमाधोपूर-लालसोट मार्गावर दुबी येथे हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार एक ३४ आसनांची प्रवासी बस सवाई माधोपूर येथून लालसोटकडे निघाली होती. ही बस त्यावेळी दुबी येथील बनास नदीच्या पुलावर आली असता, बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती बस पुलावरून ५० फुट खोल असलेल्या नदीत कोसळली. ही बस नदीमध्ये पाण्याची पातळी जास्त असल्याने पाण्यात बुडाली. या अपघातामध्ये ३० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

माधोपूर पोलिसांनी या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली आहे. पोलीस मृतदेह बाहेर काढत असून आतापर्यंत जखमी अवस्थेतेतील एकही प्रवासी आढळला नाही. मृतांची अद्याप ओळख पटली नाही.
...Read More

V. S. News
सामुहिक बलात्काराने पुन्हा दिल्ली हादरली

व्हिएस न्यूज – शालीमार पार्कमध्ये पाच दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाचा आता पुन्हा एकदा राजधानी दिल्ली सामुहिक बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. पाच अल्पवयीन मुलांनी एका वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जहांगिरपूरी येथे पालिकेच्या कचरा डेपोजवळ घडली. तरुणीने या प्रकरणी जहांगिरपूरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

या पाच मुलांनी रात्री दहाच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मुलीला ढकलले. नंतर जबरदस्तीने एमसीडी इमारतीच्या मागच्या बाजूला नेऊन या पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच, आरडा-ओरडा केल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचे या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. या तरुणीने नातेवाईकांच्या मदतीने बुधवारी दुपारी पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपी मुले ही तरुणी राहत असलेल्याच वसाहतीच्या जवळ राहणारी आहेत. ही मुले शाळाबाह्य असून कचरा डेपोवर काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
दिवसा इंजिनियर, रात्री ड्रायव्हर – हैद्राबादच्या आयटी तंत्रज्ञांची अवस्था

व्हिएस न्यूज - माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैद्राबादमध्ये संगणक अभियंत्यांना ईएमआयची समस्या भेडसावत आहे. मासिक हप्ते फेडण्यासाठी या अभियंत्यांना दिवसा तंत्रज्ञांचे तर रात्री कॅब चालविण्याचे काम करावे लागत आहे.

हैद्राबादमधील आयटी सिटीतील अनेक युवा आयटी तंत्रज्ञांचा हा नवा अवतार आहे. येथील आयटी प्रोफेशनल्स युवांनी मोठ्या संख्येने स्वतःच्या कार विकत घेतल्या आहेत. या कारच्या हप्त्यांचा बोजा त्यांच्या खिशावर पडत आहे. हेच ओझे कमी करण्यासाठी ते कॅब अॅग्रेगेटर बनत आहेत. स्थानिक माहितगारांच्या मते, सुमारे 80 टक्के कॅबचालक पार्टटाईम खासगी कार चालवतात.

विशेष म्हणजे या युवकांना या कामाबाबत काही अडचण वाटत नाही. शिवा नावाच्या संगणक अभियंत्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले, की तो दररोज रात्री 3 ते 5 तास कॅब चालवतो. त्यातून त्याला दर महिन्याला 20 हजार रुपयांची कमाई होते. त्याच्या कारचा हप्ता 11 हजार रुपयांचा आहे.

अशा प्रकारचा ट्रेंड चालू असल्याची गोष्ट ओलाच्या प्रवक्त्यानेही मान्य केली. मात्र स्वतःची गाडी कॅब म्हणून चालविणाऱ्यांचा अधिकृत आकडा उपलब्ध नाही, मात्र कॅबची संख्या वाढली असल्याचे या प्रवक्त्याने मान्य केले.
...Read More

V. S. News
आयफोन स्लो केल्याबद्दल ‘अॅपल’वर खटला

व्हिएस न्यूज - आयफोनचे जुने मॉडेल अधिक काळ चालावेत, यासाठी त्यांना जाणूनबुजून मंद करण्याची कबुली जगप्रसिद्ध कंपनी ‘अॅपल’ने दिली आहे. मात्र या कबुलीवरून कंपनीच्या विरोधात आता अमेरिकेत खटला दाखल झाला आहे.

लॉस एंजेल्सचे रहिवासी असलेले स्टेफान बोगडॅनोव्हिच आणि डाकोटा स्पिआस या दोघांनी हा खटला दाखल केला आहे. आमचे मोबाईल मंद करण्यासाठी ‘अॅपल’ने आमची कधीही संमती घेतली नव्हती, अशी तक्रार त्यांनी केली आहे. या दोघांकडे आयफोन 7 तसेच अन्य अनेक मॉडेल आहेत. मात्र कंपनीने जाणूनबुजून या फोनचा वेग कमी केल्यामुळे आमच्या मोबाईल वापरात अडथळे आले, असे त्यांनी म्हटले आहे.

फोन चालविण्यासाठी आवश्यक पॉवर नसलेल्या नव्या बॅटऱ्या नसतील, तर फोनचा कमाल वापर होण्यासाठी ते धीमेपणाने चालावेत, अशी सोय केल्याचे ‘अॅपल’ने बुधवारी मान्य केले होते.

‘अॅपल’चे नवीन मॉडेल बाजारात येताच जुने मॉडेल मंदगतीने चालतात, असे आमच्या लक्षात आल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात आमचे आर्थिक तसेच अन्य नुकसान झाल्याचा दावा करत त्यांनी भरपाईची मागणी केली आहे.
...Read More

V. S. News
आरबीआयचा तिरुपती देवस्थानाला जुन्या नोटा बदलून देण्यास नकार

व्हिएस न्यूज - नोटाबंदीनंतर रद्द केलेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तिरुमला तिरुपती देवस्थानाला नकार दिला आहे. इतकेच नाही, तर देवस्थानाने या नोटा आरबीआयच्या कार्यालयात पाठवाव्यात आणि त्याच्या कुरियरचा खर्च स्वतः भरावा, असेही सुनावले आहे.

आरबीआयने गुरुवारी तिरुपती येथे बँक अधिकाऱ्यांसोबत एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी देवस्थानाच्या अधिकाऱ्यांनी हा मुद्दा त्यांच्यासमोर उपस्थित केला.

तिरुपती देवस्थानाकडे सध्या 26 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. चलनातून रद्द केलेल्या नोटा सध्या तरी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला बदलून देणे शक्य नसल्याचे यावेळी आरबीआय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

देवस्थानाला दररोज त्याच्याकडे जमा होणारे नाणे बँकांमध्ये जमा करावे लागतात. यापैकी 2011 साली चलनातून बाद केलेले 25 पैसे, 5 पैसे, 20 पैसे आणि 10 पैशांची नाणी मुंबईतील टाकसाळीला पाठवण्यास आरबीआयने सांगितले. तसेच तिरुपती देवस्थानात 40 टन वजनाची परदेशी नाणी साचली आहे. त्यांची व्यवस्था देवस्थानाने स्वतः पाहावी, असे आरबीआयने म्हटले आहे.
...Read More

V. S. News
हिटलरची आलिशान मर्सिडिझ निघणार लिलावात

व्हिएस न्यूज - जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याची म्हटली जाणारी आलिशान मर्सिडिझ गाडी लिलावात निघणार आहे. अमेरिकेतील अॅरिझोना राज्यात पुढच्या वर्षी हा लिलाव होणार आहे. हिटलरने केलेल्या यहुदींच्या हत्याकांडाबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी या लिलावातील 10 टक्के रक्कम खर्च होणार आहे.

मर्सिडिझ-बेंझ 770के मॉडेलची ही विंटेज गाडी हिटलरच्या खासगी गॅरेजमधील असून ती 1939 साली बनविलेली आहे. “सुपर मर्सिडिझ” तसेच ग्रोस्सर नावाची ही कार सैन्य संचालनात वापरली जात होती. इटालीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याच्या जर्मनी दौऱ्यामध्ये आणि फ्रान्सवर आक्रमण केल्यानंतर या गाडीचा वापर करण्यात आला होता. वर्ल्डवाईड ऑक्शनीअर्स नावाची कंपनी ही गाडी विकणार आहे.

“ही कार खुद्द अॅडॉल्फ हिटलरशिवाय अन्य कोणीही वापरलेली नाही,” असे कंपनीने म्हटले आहे.

ही सुपर-मर्सिडिझ खास नाझी हुकूमशहासाठी बनविण्यात आली होती. त्यासाठी नाझी अधिकारी व हिटलरचा चालक एरिख केम्पका याने खास तपशील पुरवले होते.

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर ही कार अमेरिकी फौजांच्या विजयाचे प्रतीक म्हणून फ्रान्समध्ये नेण्यात आली होती. नंतर ती अमेरिकेला नेण्यात आली.
...Read More

V. S. News
पुन्हा एकदा खडसेंनी काढले आपल्याच सरकारचे वाभाडे

व्हिएस न्यूज – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्यातील अवर्षणग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबावरून स्वपक्षाला घरचा आहेर दिला. आतातरी सरकार राज्यातील दुष्काळी भागांची यादी जाहीर करणार आहे का? सरकारने डिसेंबर उलटून जानेवारी महिना आला तरी दुष्काळी गावांबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. चार-सहा महिने सर्वेक्षण होऊन उलटतात तरी दुष्काळ जाहीर केला जात नाही. लोकांनी या काळात मरायचे का? त्यादृष्टीने कोणतीही व्यवस्थादेखील सरकार करत नाही. केंद्र सरकारचे दुष्काळी क्षेत्र जाहीर करण्यासंबंधी निकष पाळायचे ठरवले तर राज्यातील एकही गाव पात्र ठरणार नाही, अशा शब्दांत खडसेंनी सरकारला सुनावले.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या या प्रश्नाला उत्तर दिले. दुष्काळी क्षेत्र ठरवण्यासाठी केंद्र सरकारने आखून दिलेले नवे निकष हे कठोर आणि वेगळे आहेत, ही बाब आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकही गाव निकषांमध्ये बसणार नाही, ही बाब तितकीशी खरी नाही. गोंदियातील तीन गावांना याच निकषांनुसार आतापर्यंत दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पण एकनाथ खडसे यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्याच सरकारचे वाभाडे काढताना दिसले.
...Read More

V. S. News
विजय रुपानी यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी निवड

व्हिएस न्यूज – विजय रुपानी यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली असून त्यांची गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. रुपानी यांच्या नावाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. तर उपमुख्यमंत्रीपदी नितीन पटेल यांची निवड झाली आहे.

भाजपने गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सत्ता मिळवली आहे. पण भाजपचे मताधिक्क्य आणि जागा या निवडणुकीत ब-यापैकी घटल्या आहेत. १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणा-या भाजपला या निवडणुकीत फक्त ९९ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने २०१२मध्ये गुजरात निवडणुकीत ११५ जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली. २०१२ मध्ये ६१ जागा जिंकणारी काँग्रेस ८८ जागांपर्यंत पोहोचली.

आज गुजरात भाजपला पटेल मतदारांची नाराजी आणि आणखी दीडवर्षांनी २०१९ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता मोदींसारखी जनमानसाची पकड घेणा-या नेत्याची आवश्यकता आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना गुजरातमध्ये घटलेला जनाधार परवडणारा नाही. यंदाची गुजरात विधानसभेची निवडणूक भाजपने विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवली.
...Read More

V. S. News
महाबळेश्वरच्या जंगलात तरूणांची रेव्ह पार्टी; पोलिसांनी टाकली धाड

व्हिएस न्यूज - महाबळेश्वर येथील लिंगमळा परिसरातील जंगलात सुरू असणाऱ्या रेव्ह पार्टीवर धाड टाकून पोलिसांनी तरूण-तरूणींना ताब्यात घेतले आहे. लिंगमळ्याच्या जंगलात बुधवारी रात्री ही पार्टी सुरू होती. या पार्टीत सहभागी झालेले बहुतेक तरूण-तरुणी या उच्चभ्रू वर्गातील आहेत. पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली तेव्हा तरूण-तरूणी याठिकाणी गाण्यांवर बिभत्सपणे नृत्य करत होते. यावेळी आठ युवकांना दोन तरूणींसह ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी या सगळ्यांच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहेत. काही लोकांना जंगलाच्या दिशेने अलिशान गाड्या जाताना दिसल्याने या रेव्ह पार्टीचा सुगावा पोलिसांना लागला. तीन गाड्यांमधून हे सर्वजण येथे आले होते. प्राथमिक माहितीनुसार, रेव्ह पार्टीत सहभागी झालेले तरूण-तरूणी दिव-दमण आणि अहमदनगर येथील मोठ्या कुटुंबातील असल्याचे समजते. या पार्टीचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी स्थानिक ट्रेकर्सना सोबत घेऊन जंगलात शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी जंगलाच्या आतील निर्मनुष्य भागात पार्टी सुरू असल्याचे आढळून आले. दरम्यान, ही हुक्का पार्टी होती किंवा रेव्ह पार्टी हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली.दरम्यान, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात पोलिसांकडून अशाप्रकारच्या पार्ट्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. सरत्या वर्षांला नशेत निरोप देऊन धुंदीतच नववर्षांचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह आसपासच्या शहरांत सध्या छुप्या रेव्ह पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. शहराबाहेरील ठिकाणांसह पब किंवा नाइट क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पाटर्य़ासाठी समाजमाध्यमांवरून सांकेतिक निमंत्रण पाठवण्यात येत असून या निमंत्रणांमध्ये पार्टीतील अमली पदार्थाचीही कल्पना देत असल्याचे उघड झाले आहे. मात्र, ही बाब लक्षात आल्याने पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने समाजमाध्यमे तसेच अशा पार्टीच्या ठिकाणांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!