Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
राज्यात लवकरच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी !

व्हीएस न्यूज - लवकरच संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी होण्याची शक्यता असून पर्यावरणावर प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे गंभीर परिणाम रोखण्यासाठी,प्लास्टिकच्या साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्याची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली असल्यामुळे प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकॉलच्या प्लेट्स, ताट, वाट्या, कप, ग्लास,बॅनर, तोरणं आणि ध्वजासह अन्य गोष्टींवर बंदी येऊ शकते.

दुकाने, मॉल्स, तसेच विविध आस्थापनांच्या परवान्यांसाठी या निर्णयानंतर प्लास्टिक वापर बंदीची अट घालण्यात येणार आहे. यासोबत प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळण्याबाबतची अट संबंधित प्राधिकरण अथवा निरीक्षकांना परवाने नूतनीकरणावेळी घालण्याच्या सूचना पर्यावरण विभागाने दिल्या आहेत.

नैसगिक आणि जैविकदृष्ट्या प्लास्टिक विघटनशील नसतो. पर्यावरणाचा समतोल प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे बिघडतो. पाण्याचा पावसाळ्यात निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. आरोग्याच्या समस्या त्यामुळे निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे.

...Read More

V. S. News
आमदार बच्चू कडू यांनी एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

व्हीएस न्यूज अचलपूर सत्र न्यायालयाने अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना दणका दिला असून न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना चांदूरबाजारमध्ये वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरी यांना मारहाण केल्या प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. बच्चू कडू यांना एक वर्ष तुरुंगवास आणि ६०० रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरी यांच्याबरोबर बच्चू कडू यांचा वाद झाला होता. बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना त्यावेळी इंद्रजीत चौधरी यांना मारहाण केली होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमक आंदोलनासाठी बच्चू कडू हे ओळखले जातात. त्यांचे अनेक सरकारी अधिका-यांबरोबर यापूर्वी झालेले वाद गाजले आहेत.

...Read More

V. S. News
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती

व्हीएस न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र लोकसवा आयोगाच्या (MPSC) प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली असून अजय मुंडे यांनी आरक्षित कोट्यातील उमेदवारांना खुल्या वर्गातून अर्ज दाखल केल्याच्या कारणावरुन अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

या याचिकेच्या माध्यमातून मागासवर्गीय कोट्यातील विद्यार्थ्याने गुणवत्तेच्या आधारवर महिला खुला वर्ग अथवा खुला वर्ग स्पोर्ट्स कोट्यातून अर्ज दाखल केला असेल, तर त्याल्या प्रवेश प्रक्रियेच्या एखाद्या टप्यावर खुल्या वर्गातून अर्ज केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवले जात असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निर्दशनास आणून देण्यात आली.

उच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. जर एखादा परिक्षार्थी गुणवत्तेच्या आधारावर खुल्या वर्गातील जागेवर अर्ज दाखल करत असेल तर त्याला विरोध का? असा सवाल करत यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने याआधीच आदेश दिलेले असतानाही जर राज्य सरकार त्याची अमंलबजावणी करत नसेल तर हा न्यायालयाच्या आदेशांचा अवमान असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावर न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.

...Read More

V. S. News
तुकाराम मुंढे यांचा काँग्रेसलाही दणका

व्हिएस न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता काँग्रेसप्रणीत इंटक या संघटनेला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.

‘पीएमपी’च्या भांडार विभागासमोरील इमारतीत राष्ट्रवादी कामगार युनियनचे कार्यालय काही वर्षांपासून होते. हे कार्यालय मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरातच रिकामे करण्याची नोटीस संघटनेला बजावली होती. हे कार्यालय मुदतीपूर्वी तीन महिने आधीच ताब्यात घेण्यात आले. संघटनेच्या वतीने याला तीव्र विरोधही करण्यात आला.

ही इमारत प्रशासकीय कारणासाठी आवश्यक असल्याने ताब्यात घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने त्या वेळी स्पष्ट केले होते. आता हीच वेळ पीएमपी कामगार संघटनेवर (इंटक) आली आहे. इंटकला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस पीएमपी प्रशासनाने बजावली आहे.
...Read More

V. S. News
सरकारने जनतेच्या तोंडाला पुसली पाने – अजित पवार

व्हिएस न्यूज - आमची शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी,शेतमालाला हमीभाव अशी मागणी होती. पण शेतकऱ्यांसह विविध घटकांतील जनतेच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. दोन समाजात मनुवादी वृत्तीच्या लोकांनी तेढ निर्माण केल्याने महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या महाराष्ट्र अस्थिर,अस्वस्थ असून राज्यात तसेच देशात असहिष्णुता पसरली असल्याचा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरात जागरण गोंधळ घालून सुरुवात करण्यात आली. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर यानंतर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणा जगजितसिंह पाटील, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर,महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील आदी दिग्गज नेते या वेळी उपस्थित होते.

माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, साडेतीन वर्षांच्या कालावधीत मोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने कोणाचेच भले केले नाही. ३ लाख कोटीवरून ८ लाख कोटींवर राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर गेला. पण सर्वसामान्यांच्या हातात काहीच पडले नाही. बोंडअळीमुळे कापूस हातातून गेला आहे. त्याचे केवळ पंचनामे करण्यात आले आहेत. पण अनुदान अद्यापही देण्यात आले नाही. उलट पाऊस पडला असतानाही शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे बिल भरण्यासाठी वीजपुरवठा तोडला जात आहे. ऊर्जामंत्री पैसे भरा नाहीतर वीज तोडण्याची दमबाजी करत आहेत. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम या शासनाने केले आहे. विदर्भाला अधिक योजना देण्यात येत आहेत. मराठवाड्यावर मात्र, अन्याय केला जात आहे. अंगणवाडी कर्मचारी, एसटी कर्मचारी, आदिवासी,विद्यार्थी, व्यापारी अशा सर्वांनाच वेठीस धरण्याचे काम सरकारने केले आहे.

...Read More

V. S. News
पोलिसांची ऑन ड्युटी आता फक्त ८ तासच!

व्हिएस न्यूज – पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिसांची ड्युटी आता ८ तासांची केली आहे.त्यामुळे आता मुंबई पोलिसांना मोठे गिफ्ट मिळाले आहे.मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही घोषणा ‘मिशन 8 अवर्स’ या कार्यक्रमात केली.

कामाचे मुंबई पोलिसांना तास नाहीत. एकदा घरातून बाहेर पडलेला पोलिस कधी १२ तासांनी, कधी १६ तर कधी २४ तासांनी घरी परततो. पोलिसांचे आरोग्य,मानसिकता, कौटुंबिक आयुष्य या सर्वांवर त्यामुळे त्याचा विपरित परिणाम होतो. सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच एकप्रकारे असुरक्षित असल्यामुळे पोलिसांच्या कामाचे तास निश्चित करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती.

आयुक्तांनी त्या पार्श्वभूमीवर अखेर पोलिसांच्या कामाचे तास निश्चित केले आहेत. याआधी ८ तासांची शिफ्ट प्रायोगिक तत्वावर देवनार पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून मुंबईतील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये ८ तासांच्या शिफ्टची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
...Read More

V. S. News
फेरीवाले राज ठाकरेंच्या बंगल्याबाहेरच बस्तान मांडणार?

व्हिएस न्यूज - फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार आले असून त्यापैकी एक हॉकर्स झोन हा राज ठाकरे यांच्या घरासमोर आणि घराच्या मागच्या बाजूला असणार आहे. त्यामुळे आता फेरीवाल्यांवरुन राज्यभरात आंदोलन छेडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरच आता फेरीवाले बसणार आहेत.

फेरीवाल्यांसाठी एम. बी. राऊत आणि केळुसकर मार्ग या दोन्ही रस्त्यांवर प्रत्येकी दहा अशा एकूण २० जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. पण या रस्त्यांवर सध्या एकही फेरीवाला बसत नाही. तसेच या परिसरात शाळा असल्याने हॉकर्स झोन तयार करण्याचा नियमावलीचे उल्लंघन करण्यात आल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांच्या घराबाहेर मुंबई महापालिकेने मुद्दाम फेरीवाल्यांना जागा दिल्याचा आरोपही मनसेने केला आहे. मनसेने एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर काँग्रेस आणि मनसेत राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर आता न्यायालयाच्या निर्णयानुसार हॉकर्स झोन तयार करण्यात आले आहेत.

...Read More

V. S. News
समाजात फूट पाडणाऱ्यांना धडा शिकवा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

व्हीएस न्युज - नवीन वर्षाची सुरवात ज्या हिंसाचाराच्या घटने मुळे झाली त्या कोरेगाव भीमा प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक घेतली, या वेळी देशात पुंन्हा पुन्हा कोरेगाव भीमा सारख्या घटना होऊ देऊ नका आसा आदेश मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी हि बैठक झाली. कोरेगाव भीमा दंगलीच्या सूत्रधारांचा बिमोड करा. जातीय विद्वेष रोखा समाजात फूट पाडणाऱ्यांना धडा शिकवा असे आदेश ही मोदींनी या वेळी दिले. या घटना समाजात तेढ निर्माण करणाऱ्या ,फूट पाडणाऱ्या आहेत. परंतु संघ आणि भाजप काहीही अघटीत घडु देणार नाही असेही मोदींनी या वेळी सांगितले.

...Read More

V. S. News
दौंड मध्ये गोळीबार करून तिघांची हत्या करणाऱ्या एसआरपीएफच्या जवानाला अटक

आर्थिक वादातून हत्या.

व्हीएस न्यूज - दौंड येथे आर्थिक वादातून भारतीय राखीव दलाच्या साहाय्यक उपनिरीक्षकाने रागाच्या भरात सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून तिघांवर गोळीबार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी घडला. तिघांचा खून केल्यानंतर पोलिस शस्त्रासह त्याच्या घरात लपून बसल्यामुळे जमाव व पोलिसांचे पथक बराच काळ घराला वेढा देऊन बसले होते; पण उपनिरीक्षक नगरच्या दिशेने पसार झाला. अखेर सुपा पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
या घटनेनंतर दौंड शहरात तणावाचे वातावरण होते. त्याने आर्थिक वादातून व पूर्ववैमनस्यातून तिघांना गोळ्या घातल्याचे समोर आले आहे. संजय बी. शिंदे (वय ३३ रा. अथर्व अपार्टमेंट, गोपाळवाडी रोड, दौंड ) असे अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे. या घटनेत परशुराम गुरुनाथ पवार (वय ३३), गोपाळ काळुराम शिंदे (वय ३५) (दोघेही राहणार वडारगल्ली, दौंड), अनिल जाधव (वय ३०, रा बोरावकेनगर, दौंड ) यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हा भारती राखीव दलाच्या कोल्हापूर युनिटचा असून, तो सध्या दौंड येथे क्रमांक सातच्या बटालियनमध्ये नेमणुकीला होता. त्याला जुगाराचे व्यसन होते. तो एकाला पैसे देणेही लागत होता, तर गोपाळकडून त्याला दहा हजार रुपये येणे होते. मंगळवारी दुपारी शिंदे हा दौंड शहराच्या नगर मोरी परिसरात गोपाळकडे पैशाची मागणी करण्यासाठी गेला. त्या वेळी त्याची गोपाळशी वादावादी झाली. त्यातून त्याने गोपाळवर गोळीबार केला. या वेळी गोपाळचा मित्र परशुराम याने त्याला मारण्यासाठी दगड उचलल्यामुळे त्याने परशुरामला गोळ्या घातल्या. त्याच ठिकाणी त्याने सात गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो अनिल जाधव याच्या घरी गेला. त्याला घराच्या बाहेर बोलावून थेट त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. काही वर्षापूर्वी अनिल जाधव याने शिंदे याच्या आईला रॉडने मारहाण केल्याचा बदला त्याने घेतला. गोळाबार केल्यानंतर शिंदे त्या ठिकाणाहून पसार झाला.
दौंड शहरात गोळीबाराच्या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मारेकरी त्याच्या घरी गेला आहे, अशी चर्चा सुरू झाली. दुपारी दोनच्या सुमारास गोळीबारात मृत पावलेल्या युवकांचे मित्र, नातेवाइक व जमाव गोपाळवाडी रोड येथील आरोपीच्या घराजवळ जमा झाला. आरोपीच्या घराची दारे- खिडक्या बंद असल्याने थेट आत जाण्यात धोका होता. तो प्रशिक्षित व हत्यारबंद असल्याने आणि तो पुन्हा गोळीबार करील, याची भिती पोलिसांना होती; तसेच पोलिसांना त्या ठिकाणी जमा झालेल्या संतप्त जमावावर नियंत्रण ठेवावे लागत होते.
पुणे ग्रामीण पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या मोठ्या फौजफाट्याने शिंदे याच्या घराला वेढा घातला. बराच वेळ होऊनही काहीही हालचाल दिसून आली नाही, त्यामुळे तो घरात नसल्याचे स्पष्ट झाले. तो तेथून पसार झाला होता. शिंदे नगर रस्त्याने येण्याची शक्यता पुणे ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षाने नगर पोलिस नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यांनी ही माहिती सुपा पोलिस ठाण्यास कळविली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी शिंदेला सुपा येथून अटक केल्याचे सांगितल्यानंतर जमाव पांगला.
याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले, की ‘संजय शिंदे हा गुन्हेगारी खुनशी व प्रवृत्तीचा आहे. त्याने आर्थिक वादातून दोघांना गोळ्या घातल्या आहेत आणि एकाला पूर्ववैमनस्यातून गोळ्या घातल्या आहे. या आरोपीला नाकाबंदी करून सुपा पोलिसांनी पकडले आहे. शिंदे याने या घटनेपूर्वी तो ज्या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणाहून एक पिस्तुल व २२ जिवंत काडतुसे घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोपेडवरून नगरकडे जाताना अटक
संजय शिंदे हा तिघांवर गोळीबार करून मोपेडवरून पुणे रस्त्याने नगरच्या दिशेने येत होता. सुपा पोलिसांच्या पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर त्याला सायंकाळी सहाच्या सुमारास सापळा रचून पकडले. त्याच्याकडून एक पिस्तुल व बारा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने टोलनाक्यापासून काही अंतरावर सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास विनानंबरच्या ज्युपीटर मोपेडवरून तो नगरच्या दिशेने भरधाव वेगात येत असल्याचे दिसले. त्याच्याकडे पिस्तुल असल्याची शक्यता असल्याने थेट पकडणे धोक्याचे होते. म्हणून पोलिसांनी टोलनाका ओलांडून त्याला नगरकडे काही अंतर येऊ दिले. त्यानंतर त्याचा ‘सिनेस्टाइल’ पाठलाग सुरू केला. तो जवळ येताच पोलिसांनी त्याच्या एका बाजूने चारचाकी वाहन व दुसऱ्या बाजूने दोन मोटारसायकलींनी वेढले. इंग्रजीतील ‘व्ही’ आकाराप्रमाणे घेरून त्याला दुचाकीचा वेग कमी करण्यासाठी प्रवृत्त केले. वेग कमी होताच पाठलाग करणाऱ्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या पोलिसाने त्याच्या दिशेने एसएलआर रायफल रोखली. त्यानंतर काही क्षणातच झडप घालून त्याला पकडले. त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल व १२ जिवंत काडतुसे सापडली. दहा गोळ्या त्याने दौंड येथे फायर केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सुपा पोलिस ठाण्यात नेले व पळून जाण्यासाठी वापरलेली मोपेडही ताब्यात घेतली.
तो एसआरपीएफमध्ये सेवेत असल्याने दौंड येथे वास्तव्यास होता. त्याचे मूळ गाव जामखेड तालुक्यातील खर्डा येथे असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली.
पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी शिवाजी कडूस, सुखदेव दुर्गे, यशवंत ठोंबरे, अनिल गिरीगोसावी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
...Read More

V. S. News
२२ वर्षांनी घटस्पोटाचा अर्ज मंजूर

व्हीएस न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाने बायकोचे टोमणे हे पतीसाठी क्रूर वर्तन आहे, असा निर्वाळा देत ६२ वर्षीय पतीला घटस्फोट मंजूर केला आहे. पतीने लग्नाच्या २३ वर्षांनी घटस्फोटाचा अर्ज केला होता, त्यानंतर न्यायालयाने तब्बल २२ वर्षांनी हा अर्ज मंजूर केला.

संसार म्हटला कि पती-पत्नीमध्ये छोट्या-मोठ्या कुरबुरी रोजच्याच असतात. पण सतत पतीला पत्नीने मारलेले टोमणे हे क्रौर्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. अखेर ६२ वर्षीय पतीला लग्नाच्या ४५ वर्षांनी घटस्फोट मिळाला. त्यांचे लग्न १९७२ साली झाले होते. लग्नाच्या २३ वर्षांनंतर पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या जोडप्यात अपत्य नसल्याच्या कारणावरुन वारंवार भांडणे होत असल्याची माहिती आहे. आपल्याशी पत्नी कधीच नीट वागली नाही, मूल होत नसल्यामुळे ती सतत टोमणे मारते, असा आरोप त्यांनी केला होता. उभयतांमधला वाद विकोपाला गेल्यामुळे १९९३ पासून ते विभक्त राहत होते. घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर टोमणे मारण्याच्या मुद्द्यावरुन कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा घटस्फोट नामंजूर केला होता. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायमूर्ती के. के. तातेड आणि एस. के. कोतवाल यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करताना मूल न होण्यावरुन टोमणे मारणे ही क्रूरता असल्याचे म्हणत त्यांचा घटस्फोट मंजूर केला. पण पत्नीला दरमहा खर्च देण्याचा आदेश देत पत्नी राहत असलेल्या घराबाबतही वाद न करण्यास सांगितले आहे.

...Read More

V. S. News
गुन्हे दाखल असनूही संभाजी भिडे, एकबोटेंना अटक नाही

व्हीएस न्यूज - अजामिनपात्र गुन्हे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांवरही दाखल असून हे कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराला दोघेही जबाबदार असतानाही त्यांना सरकार अटक करत नाही. या दोघांपुढे सरकार झुकले आहे, अशी जहरी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

पोलिसांनी महाराष्ट्र बंद आंदोलनानंतर कोबिंग ऑपरेशन राबवून कार्यकर्त्यांची धरपकड केली. कोंबिंग ऑपरेशन राबवण्याचा अधिकार पोलिसांना नाही, आम्ही याविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. दोन प्रकारच्या हिंदू संघटना भारतात आहे, त्यातली एक संघटना लोकांमध्ये जाते, तर दुसरी आपले मत लोकांवर लादत असते. ही दुसरी संघटना आता हिंसाचारावर उतरली आहे आणि हिंदूंनाच मारण्यास सुरुवात केली आहे. भारतात प्रत्येक राज्यात अशाप्रकारचे हाफिज सईद आहेत, असा घणाघात आंबेडकर यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणानंतर चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली होती. पण ही समिती अद्याप नेमण्यात आली नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

...Read More

V. S. News
आधार पडताळणीसाठी आता चेहऱ्याची पडताळणी

व्हीएस न्यूज - आधारच्या पडताळणीसाठी बोटांचे ठसे आणि बुबुळांप्रमाणे आता चेहरा ओळखण्याच्या पर्यायाचाही (फेस रेकग्निशन) समावेश करण्यात येणार असून १ जुलैपासून नवी सुविधा कार्यान्वित होणार असल्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

वयोवृद्ध व्यक्तींमध्ये अनेकदा बोटांचे ठसे अस्पष्ट होतात वा बुबुळांच्या साह्य़ाने पडताळणी करणे शक्य होत नाही. अशा वेळी आधारची पडताळणी करण्यात अडचणी येतात. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वीच आधारच्या पडताळणीसाठी ठसे आणि बुबुळांचा वापर पुरेसा नसल्याचे मत व्यक्त केले होते. केंद्र सरकारच्या धोरणानुसार आर्थिक व्यवहार करताना पॅन क्रमांकाच्या बरोबरीने आधार क्रमांक देणेही सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकासाठी आधारची पडताळणी गरजेची ठरते. चेहऱ्याचा पर्यायही उपलब्ध होत असल्याने लोकांसाठी अतिरिक्त सुविधा मिळणार आहे. गेल्याच आठवडय़ात यूआयडीएआयने १६ आकडी आभासी क्रमांकाचा पर्यायही उपलब्ध करून दिला होता. आधारसाठी दाखल केलेल्या माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर प्राधिकरण कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!