Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
पद्मावतची नवव्या दिवसापर्यंत २०० कोटींची कमाई..

व्हीएस न्यूज - बॉक्स ऑफीसवर संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावत’ चित्रपट चांगलीच कमाई करत असून मागच्या वर्षी सुपर हिट ठरलेला‘टायगर जिंदा है’ चित्रपटाचा रेकॉर्ड या चित्रपटाने तोडला आहे. चित्रपटाने १० दिवसाच्या आतच २०० कोटींचा आकडा पार केला आहे.

‘पद्मावत’ने प्रदर्शित झाल्यानंतर नवव्या दिवशी १६ कोटींची कमाई केली. त्याचबरोबर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने १४ कोटी कमविले होते. अभिनेता रणवीर सिंह पद्मावतच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल खूपच आनंदात आहे. यावर तो म्हणाला, की बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला यश प्राप्त होण्याचे कारण म्हणजे मनोरंजनाच्या रुपात चांगले काम केले आहे. कलाकारांचे मनोरंजन करण्यात यश म्हणजेच चित्रपटाचे यश होय. यावर दीपिका पदुकोण म्हणाली, की यावेळी बॉक्स ऑफिसचे कलेक्शन महत्वाचे आहे. चित्रपटाच्या शुटींगसाठी भरपूर पैसे लागले, चित्रपटाची जास्त कमाई होणे महत्वाचे आहे.

...Read More

V. S. News
राहुल द्रविड बीसीसीआयच्या दुजेभावावर नाराज

व्हीएस न्यूज - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अंडर १९ वर्ल्डकप पटकावणारा भारतीय संघ, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफवर बक्षिसाची उधळण केली असली तरी बीसीसीआयवर प्रशिक्षक राहुल द्रविड नाराज आहे. द्रविड स्वतःला ५० लाख रुपये मिळाले असतानाच सपोर्ट स्टाफला मात्र फक्त २० लाख रुपये दिल्याने नाराज असल्याचे समजते. पण द्रविडचे यावरुन कौतुक होत असून पुन्हा एकदा द्रविडमधील प्रामाणिकपणा आणि खेळाप्रती असलेली भावना याची प्रचिती आली.

बीसीसीआयने अंडर- १९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना प्रत्येकी ३० लाख रुपये, सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २० लाख रुपये आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. पण द्रविड यावरच नाराज आहे. द्रविडने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफपेक्षा मुख्य प्रशिक्षकाला जास्त रकमेचे पारितोषिक जाहीर केल्याबद्दल नाराजी दर्शवली. सपोर्ट स्टाफमधील सर्वांना समान पारितोषिक दिले पाहिजे, असे द्रविडचे म्हणणे असून दुजाभाव होऊ नये यावर द्रविडने भर दिला आहे. आपले मत द्रविडने बीसीसीआयपर्यंत पोहोचवल्याचे वृत्त आहे. सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याने एक टीम म्हणून काम केले आणि भारताला वर्ल्ड कपच्या विजेतेपदापर्यंत पोहोचवण्यात योगदान दिले. त्यामुळे सर्वांना समान पारितोषिकच मिळाले पाहिजे,अशी द्रविडची भूमिका आहे.

...Read More

V. S. News
अबुधाबीमधील भारतीयांना प्रथमच साद घालणार पंतप्रधान मोदी

व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी आखाती देशांना भेट देत असून मोदी ११ फेब्रुवारी रोजी विक्रमी संख्येने उपस्थित राहणाऱ्या भारतीयांना मित्रों अशी साद घालताना प्रथमच दिसणार आहेत. हा दौरा फेब्रुवारी ९ ते १२ या दरम्यान असून हा ऐतिहासिक सोहळा मस्कत, ओमान येथे रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मोदींविषयी ओमानमध्ये प्रचंड कुतूहल असून मोदींचे मस्कतच्या सुलतान कुबूस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अनिवासी भारतीयांच्या सभेत भाषण ठेवण्यात आले आहे. ओमानमधील हे सर्वात मोठे स्टेडियम आहे.

ओमानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्यासाठी येथे खूपच उत्सुकता असल्याचे म्हटले आहे. मोदी नेहमीच जगभरातील भारतीयांशी संवाद साधण्यासाठी तत्पर असतात आणि जगभरातील भारतीयांना देशाचे राष्ट्रदूत किंवा एकप्रकारे अँबॅसिडर असेच ते संबोधतात असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

मोदींना या दौऱ्यात अबू धाबीमध्ये पहिले मंदीर बांधण्यात येणार असून या मंदिराच्या शिला–पूजन समारंभाची व्हिडीओ लिंकही बघायला मिळणार आहे. मोदींसाठी पश्चिम आशियातील हा दौरा या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या आखाती देशांमध्ये केवळ दुबईमध्ये हिंदूंचे एकमेव मंदिर आहे.

...Read More

V. S. News
महाराष्ट्र पोलिसांनी परत केली निकृष्ट दर्जाचे बुलेट प्रूफ जॅकेट

व्हीएस न्यूज - मुंबईत 2008 साली झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मिळालेल्या 4600 बुलेट प्रूफ जॅकेटपैकी एक तृतीयांश जॅकेट महाराष्ट्र पोलिसांनी परत केली आहेत. एके-47 बंदुकीच्या गोळ्यांच्या चाचणीत अयशस्वी ठरल्यामुळे हे जॅकेट परत करण्यात आले आहेत. कानपूर येथील उत्पादन कंपनीकडून तीन टप्प्यांमध्ये हे जॅकेट आले होते. त्यातील 1430 जॅकेट परत करण्यात आले आहेत. ही कंपनी अन्य केंद्रीय सुरक्षा दलांनाही अशा प्रकारचे जॅकेट पुरवते.

‘‘एके-47च्या गोळ्यांच्या चाचण्यांमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे आम्ही 1400 पेक्षा अधिक बुलेट प्रूफ जॅकेट उत्पादक कंपनीला परत केले आहेत,” असे अतिरिक्त पोलिस महासंचालक (खरेदी आणि समन्वय) व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

पोलिस खात्याने या कंपनीला 5,000 बुलेट प्रूफ जॅकेट पुरविण्याचा आदेश दिला होता. सीमा शुल्क ड्यूटी आणि अन्य शुल्कांसह कंपनीला 17 कोटी रुपये देण्यात आले होते आणि त्या बदल्यात 4600जॅकेट खात्याला मिळाले होते. चंडीगड येथील केंद्रीय फोरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा येथे करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये सुमारे 3,000 जॅकेट उत्तीर्ण झाले, अशी माहिती अन्य एका अधिकाऱ्याने दिली. मात्र 1,430 जॅकेटमधून चाचण्यांदरम्यान एके-47च्या गोळ्या आरपार गेल्या त्यामुळे ते परत करण्यात आले.

‘‘आम्ही उत्पादकांना नव्या मालातून 1,430 जॅकेट बदलण्यास सांगितले. बुलेटप्रूफ जॅकेटचा दर्जा आणि मानकांसोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि आम्ही ते बुलेटप्रूफ जॅकेट तपासणी करूनच घेऊ,’’ असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
युपी सरकारने आखली गोमूत्रापासून औषधे तयार करण्याची योजना

व्हीएस न्यूज - गोमूत्रापासून औषधे तयार करण्याची योजना उत्तर प्रदेश सरकारने आखली असून त्याला उत्तेजनही दिले जाणार आहे. याबाबत माहिती देताना तेथील आयुर्वेद खात्याचे संचालक डॉ. आर.आर.चौधरी यांनी सांगितले, की गोमूत्रापासून आठ औषधे आमच्या विभागाने बनवली असून यकृत आजार, सांधेदुखी, प्रतिकारशक्तीची कमतरता यावर ती उपयुक्त आहेत. लखनौ व पीलभीत येथे राज्यातील आयुर्वेद विभागाचे दोन औषध प्रकल्प असून गोमूत्र, गाईचे दूध, तूप यापासून औषधे तयार तेथे केली जातात. राज्यात बांदा, झांसी, मुझफ्फरनगर, अलाहाबाद, वाराणसी,बरेली, लखनौ व पीलभित येथे आठ आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालये आहेत. आयुर्वेदातील पदवी तेथे दिली जाते. हजारो रूग्ण रोज तेथे उपचारासाठी येत असतात. रोज सातशे ते आठशे रूग्ण लखनौ येथे आयुर्वेद रूग्णालयाच्या ओपीडीमध्ये येतात. जर आठ रूग्णालयांची संख्या एकत्र केली तर रोज हजारो रूग्ण उपचारासाठी या रूग्णालयांमध्ये येतात.

चौधरी यांनी सांगितले, की आयुर्वेदाचा गोमूत्र हा एकात्म भाग आहे, गाईपासूनची इतर उत्पादनेही उपयोगी आहेत. यकृत आजार, सांधेदुखी, प्रतिकारशक्तीची कमतरता यावर गोमूत्रावर आधारित औषधे सध्या आम्ही देतो. त्यांचा वापर विस्तारण्याचा आता विचार आहे. दोनच औषध प्रकल्प ही औषधे उत्तर प्रदेशात तयार करतात त्यामुळे त्यांची संख्या वाढवण्यात येईल. या दोनच सरकारी कंपन्या आहेत,पण गोमूत्रापासून औषधे तयार करणाऱ्या खासगी कंपन्या अनेक आहेत. आयुर्वेद महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणही चालू करण्याचा विचार आहे.

...Read More

V. S. News
पात्रता नसलेली व्यक्ती राजकारणात कधी पुढे येईल याचा नेम नाही - खडसे

व्हीएस न्यूज - पंतप्रधान होण्याची क्षमता लेवा पाटीदार- पटेल समाजात असून ती लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात होती, इतिहासाचा धांडोळा घेतल्यावर हे सहज लक्षात येते. पण पात्र माणसाला राजकारणात केव्हा बाजूला सारले जाईल अन् पात्रता नसलेली व्यक्ती पुढे येईल याचा काही नेम नाही. जशी निर्माण करण्याची धमक आपल्यात आहे तसेच ते भस्मसात करण्याचीही असल्याचा गर्भित इशारा भाजपचे नाराज नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वपक्षीयांना दिला.

एकनाथ खडसे यावल तालुक्यातील पाडळसे येथे लेवा पाटीदार समाजाच्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. या समाजाचे तीन आमदार, पाच माजी आमदार, एक खासदार, दाेन माजी खासदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित हाेते. शंखनाद करून पाच युवतींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने ३३ वर्षांनंतर हाेणाऱ्या या महाअधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी सलग ५२ वर्षे समाजाचे कुटुंबनायक पदाची जबाबदारी सांभाळणारे रमेश विठू पाटील यांचा सपत्नीक गाैरव करण्यात आला.

...Read More

V. S. News
शरद पवारांनीच एकबोटेला ‘मोक्का’पासून वाचवले - प्रकाश आंबेडकर

व्हीएस न्यूज - २००१ मध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड येथील हिंदू- मुस्लिम दंगलीसंदर्भात कोरेगाव भीमा हिंसाचाराचा सूत्रधार मिलिंद एकबोटे याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्याची पुणे पोलिसांनी शिफारस केली होती. पण तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना तशी कारवाई न करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.

त्यांनी पुणे पोलिसांना त्यावेळची नोटही पत्रकारांना सादर करत एकबोटेवर तेव्हाच कारवाई झाली असती तर कोरेगावात हिंसाचार घडलाच नसता, असा दावाही केला. ‘मुँह मे राम, बगल मे छुरी’ असे शरद पवार यांचे आजपर्यंतचे वर्तन राहिले असल्याचे आंबेडकर म्हणाले. भाजपशी संबंधित एकबोटे होते, तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीशी घातल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असेल अशा कोणत्याही राजकीय आघाडीत भारिप बहुजन महासंघ सामील होणार नाही. त्यामुळेच आपण २६ जानेवारी रोजी निघालेल्या संविधान बचाओ रॅलीत सहभागी नव्हतो, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

...Read More

V. S. News
नरेंद्र मोदींना फक्त राहुल गांधीच पर्याय : काँग्रेस

व्हीएस न्यूज - येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकजुटीचा प्रयत्न करत आहेत. मात्र मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने या प्रयत्नांना खोडा घातला असून काँग्रेस हीच विरोधकांच्या एकतेचा कणा बनेल, असे म्हटले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांना पर्याय केवळ राहुल गांधीच असू शकतात, असेही पक्षाने म्हटले आहे.

काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. ‘‘मोदींजीचा पर्याय केवळ आणि केवळ राहुलजी हेच आहेत. अन्य कोणीही होऊ शकत नाही. काँग्रेस आणि देशातील लोक राहुलजींना देशाचा पुढील पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात,’’ असे ते म्हणतात.

‘‘आज दोन मॉडेल आहेत…मोदी मॉडेल यात ते दिवसातून सहा वेळेस कपडे बदलतात, आपल्या कपड्यांची सुरकुतीही बिघडू देत नाहीत, आपल्या वेशभूषेवर शासनापेक्षा जास्त वेळ घालवतात. दुसरे मॉडेल आहे राहुल गांधी यांचे. ते साधेपणा, सरळता आणि स्पष्टतेवर आधारित आहे. राहुल गांधी राजकारणात त्यांची निर्भीडता, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेमुळे प्रसिद्ध झाले आहेत. ते कठोर निर्णय घ्यायला घाबरत नाहीत,’’ असे ते म्हणाले. विरोधकांच्या एकजुटीबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘बिजू जनता दल, शिवसेना आणि आता तेलुगु देसम हे पक्ष हळूहळू वेगळे होत आहेत. तर काँग्रेस वेगवेगळ्या पक्षांच्या एकतेचा कणा बनत आहे. ही एकता 2019 मध्ये बदलांचा आधार बनेल.’’

...Read More

V. S. News
एका वर्षात 7,000 भारतीय कोट्यधीशांनी सोडला देश!

व्हीएस न्यूज - भारत सोडून परदेशात स्थायिक होणाऱ्या कोट्यधीश व्यक्तींच्या संख्येत गेल्या वर्षी वाढ झाली असून कोट्यधीशांनी देश सोडण्याच्या बाबतीत भारताचा चीननंतर क्रमांक लागला आहे. गेल्या एका वर्षात (2017) भारतातील तब्बल 7,000 व्यक्तींनी आपला कायमस्वरूपी निवास स्थायी निवास (डोमिसाइल) बदलला. आधीच्या वर्षाच्या मानाने ही संख्या 16 टक्क्यांनी वाढली आहे. न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

या अहवालानुसार, 2017 मध्ये 7,000 कोट्यधीशांनी अन्य देशात स्थलांतर केले. वर्ष 2016 मध्ये ही संख्या 6,000 आणि 2015 मध्ये 4,000 होती. जागतिक पातळीवर चीनमधील 10,000 कोट्यधीशांनी2017 या एका वर्षात अन्य देशांत घर केले. देश सोडणाऱ्यांपैकी भारतीय कोट्यधीशांनी अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड या देशांना पसंती दिली आहे, तर चिनी कोट्यधीशांनी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला निवास करणे पसंत केले आहे. अन्य देशांतील श्रीमंतांनी अन्यत्र स्थलांतर करणाऱ्यांमध्ये तुर्कीतील 6,000, ब्रिटनमधील 4,000, फ्रान्समधील4,000आणि रशियातील 3,000 कोट्यधीश व्यक्तींनी आपला देश सोडला आहे.

...Read More

V. S. News
श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर

व्हिएस न्यूज - यंदाचा व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जाहीर झाला आहे. मुंबई आंतराष्ट्रीय फिल्म महोत्सव-२०१८ च्या सांगता सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना राज्यपाल सी.विद्यासागरराव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

एक स्वतंत्र समिती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. यात किरण शांताराम, राहुल रावल, प्रसून जोशी, भारती प्रधान आणि विनोद अनुपम यांचा सहभाग होता. श्याम बेनेगल यांच्या भारतीय सिनेसृष्टीतील कार्याची समितीने दखल घेऊन, त्यांना हा पुरस्कार जाहीर केला.

आपल्या कारकीर्दीत श्याम बेनेगल यांनी २८ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. यात अंकुर, निशांत, मंडी, भूमिका, मंथन आणि जुनूनसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांनी ४१ माहितीपटांचीही निर्मिती केली. बेनेगल यांना त्यांच्या ‘अरोहन’ (१९८२) या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २००५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. त्याशिवाय, त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
...Read More

V. S. News
“पद्मावत”साठी अक्षयकुमारने पॅडमॅनची तारीख पुढे ढकलली

व्हीएस न्यूज - करणी सेना आणि इतर राजूपत संघटनांकडून ‘पद्मावत’ चित्रपटाला होणारा विरोध, चित्रपटावर मेवाडच्या राजघराण्याकडून असणारी नाराजी यासोबतच ‘पद्मावत’पुढे अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे आणखी एक आव्हान होते. पण ऐनवेळी ‘पद्मावत’साठी अक्षय कुमारने एक महत्त्वाचा निर्णय घेत या चित्रपटाच्या वाटेतील एक अडथळा दूर केला.

अक्षयने ‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत होण्यासाठी त्याचा बहुचर्चित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट ‘पद्मावत’नंतर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. अक्षयने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख भन्साळींच्या बिग बजेट चित्रपटाचे महत्त्व आणि त्यांनी आतापर्यंत सामना केलेल्या अडचणींचा आढावा घेत बदलली. अक्षयने हा निर्णय मोठ्या मनाने घेतला आणि त्याला पाहून भन्साळीही भारावले. ‘पद्मावत’च्या यशामध्ये अक्षयने मनापासून शुभेच्छा देत त्याने एक प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावली असे म्हणायला हरकत नाही. आता भन्साळी एका वेगळ्या मार्गाने त्याच्या याच उपकारांची परतफेड करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात अक्षयसोबत एका चित्रपटावर भन्साळी काम करणार असून याद्वारे ते त्याच्या उपकारांची परतफेड करणार आहेत. दरम्यान, ९ फेब्रुवारीला अखेर ‘पॅडमॅन’च्या रुपात अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

...Read More

V. S. News
एसबीआय आणणार प्रथमच शेतकऱ्यांसाठी क्रेडीट कार्ड

व्हीएस न्यूज - भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने केवळ शेतकऱ्यांसाठी विशेष क्रेडिट कार्ड सादर केले आहेत. सध्याच्या किसान क्रेडिट कार्ड्सच्या (केसीसी) विपरीत नवीन एसबीआय कार्ड शेतकऱ्यांना कमी व्याज दराने 40 दिवसांची मुदत मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्ड्समध्ये कर्जाची रक्कम लगेच खात्यातून डेबिट केली जाते.

सध्या, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये हा पथदर्शी प्रकल्प सुरू आहे. एसबीआय क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना 40 दिवसांचे क्रेडिट मिळणार आहे. तसेच इतर एसबीआय कार्डांपेक्षा या कार्डवर व्याजाचे दर कमी असतील. कार्ड धारकांना या कार्डवरील क्रेडिट मर्यादेपैकी सुमारे 20टक्के रक्कम ग्राहकोपयोगी वस्तूंवर खर्च करता येईल, तर 80 टक्के रक्कम शेती उत्पादनांसाठी वापरण्याची मुभा असेल. या योजनेअंतर्गत 100 अर्ज अगोदरच प्राप्त झाले आहेत, अशी माहिती एसबीआयच्या अध्यक्षांनी दिली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!