Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
अर्थव्यवस्थेची झाली कासवछाप अगरबत्ती - शिवसेना

व्हीएस न्यूज - शिवसेनेने केंद्र सरकारचा केंद्रीय अर्थ संकल्पावरून समाचार घेतला असून जुनीच स्वप्ने आणि जुन्या घोषणा अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पात असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

अर्थव्यवस्थेची कासवछाप अगरबत्ती मोदी सरकारच्या एककल्ली आणि आततायी धोरणामुळेच झाल्याची टीका करतानाच केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा स्वप्नांचाच भुलभुलैय्या देशातील जनतेसमोर ठेवला असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. ग्रामीण भागातील जनता दुरावत असल्याचे गुजरात निवडणुकीतून सरकारच्या लक्षात आल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागावर भर देण्यात आला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरही शिवसेनेने लक्ष वेधले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात १० वर्षांत जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापेक्षा जास्त आत्महत्या गेल्या साडेतीन वर्षांत झाल्या आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीचे आकडे सरकारने मिरवावेत, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल हा अर्थसंकल्प काहीच सांगत नाही, असे म्हटले आहे. ‘महागाई’ या शब्दाचा उल्लेखही अर्थसंकल्प मांडताना केला नाही. काँग्रेसचे सरकार तीन वर्षांपूर्वी महागाईच्या आगीत जमीनदोस्त झाले. देशातील जनता नवे सरकार महागाई आटोक्यात आणेल आणि आपले जीवन सुसह्य होईल अशी भाबडी आशा बाळगून होती, पण जनतेच्या नशिबाचे भोग मागच्या पानावरून पुढे सुरूच राहिल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे म्हणजे विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ‘तेच ते नि तेच ते..!’ असा हा अर्थसंकल्प असल्याचा चिमटा सेनेने सरकारला काढला आहे.

...Read More

V. S. News
मुख्यमंत्री हे रतन खत्रीकडे कामाला होते का ? : राज ठाकरे

व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासकामांच्या बाबतीत रोज नवे आकडे देत आहेत. रतन खत्रीकडे ते काय कामाला होते का?, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सरकार आणि विरोधकांवरही तोंडसुख घेतले.

पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या खास शैलीत शाब्दिक फटकारे लगावले. मोदींचे हे शेवटचे बजेट आहे. तेवढ्या वेळात आज आपला हिशोब आटोपून घेऊ, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. त्यांनी यावेळी बोलताना अनेक विषयांना हात घालत आपल्या खास शैलीत शाब्दिक फटकारे लगावले. शाहू, फुले,आंबेडकरांचे नाव निवडणूक जिंकण्यासाठी घेतले जाते. जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्राला अडकवून पुढाऱ्यांनी वाटोळे केल्याचेही राज म्हणाले.

...Read More

V. S. News
आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार पासपोर्ट

व्हीएस न्यूज - परराष्ट्र मंत्रालयाने अवघ्या तीन दिवसात तात्काळ पासपोर्ट हाती देण्याची सुविधा केली असून परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ पासपोर्टसाठी क्लास वन श्रेणीतील अधिकाऱ्याकडून सत्यप्रत प्रमाणपत्र आणण्याची अट शिथील केली असल्यामुळे तुम्हाला आता तिसऱ्या दिवशी तात्काळ पासपोर्ट मिळू शकेल. साधारण ३ हजार ५०० रुपये तात्काळ पासपोर्ट काढण्यासाठी मोजावे लागणार आहेत.

तुम्हाला आधार कार्डासोबत नियमाप्रमाणे ठरलेल्या विविध १२ प्रमाणपत्रांपैकी कोणत्याही दोन प्रमाणपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या सर्व कागदपत्रांची योग्य पूर्तता झाल्यानंतर पासपोर्ट तयार होऊन पोलिस रिपोर्ट मागवण्यात येईल. त्याचबरोबर केंद्र सरकारने अकुशल कामगारांना केशरी पासपोर्ट देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्याचप्रमाणे पासपोर्टचे शेवटचे पान कोरे ठेवण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे.

...Read More

V. S. News
संजय दत्तला तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीमुळेच मुदतपूर्व सोडण्यात आले – उच्च न्यायालय

व्हीएस न्यूज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा अभिनेता संजय दत्त याला तुरुंगातून लवकरच सोडण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या संजय दत्तची आठ महिने लवकर सुटका करण्यात आली होती. उच्च न्यायालयात या सुटकेविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. आज न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. यावेळी यासंदर्भातील गृह खात्याच्या निर्णयाची कागदपत्रे राज्य सरकारने न्यायालयात सादर केली. यावरून कोणाताही दुजाभाव संजय दत्तला तुरुंगातून लवकर सोडताना केला नाही, हे सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने म्हटले.

आम्हाला कोणताही विरोधाभास गृहमंत्रालयाने सादर केलेली कागदपत्रे आणि राज्य सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणात आढळलेला नाही. नियमांचे उल्लंघन किंवा अधिकारांचा गैरवापर झाल्याचेही यामध्ये दिसत नसल्याचे सांगत ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पण यावेळी न्यायालयाने भविष्यात कैद्यांची पॅरोल किंवा फर्लो रजा मंजूर करताना गरज लक्षात घेऊन आणि पारदर्शक धोरणाचा अवलंब करावा, असे सांगितले.

...Read More

V. S. News
राजस्थान पोटनिवडणुकीत भाजपला काँग्रेसचा ‘दे धक्का’

व्हीएस न्यूज - काँग्रेसने भाजपला राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसने येथे लोकसभेच्या दोन आणि विधान सभेची एक जागा जिंकली आहे.

मतमोजणी सकाळी सुरु झाली तेव्हाच काँग्रेसने आघाडी घेतली होती. काँग्रेसने अजमेर आणि अलवर लोकसभा पोटनिवडणुकीत आघाडी घेतली होती. तर भाजपने मांडलगढ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मागे टाकले होते. पण तेथेही काँग्रेसने बाजी मारली आहे. दरम्यान, राज्यस्थानमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता असल्यामुळे भाजपचा हा पराभव म्हणजे जोरदार धक्का आहे.

या तीन ठिकाणी भाजप खासदार प्रा. सांवर लाल जाट (अजमेर), खासदार चांद नाथ योगी (अलवर) आणि आमदार कीर्ति कुमारी (मांडलगढ) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. त्याची आज मतमोजणी सुरु झाली. राजस्थानमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता होती. तर दुसरीकडे काँग्रेसने आधीच विजयाचा दावा केला होता आणि तो दावा त्यांनी निवडणूक जिंकून खरा केला आहे.

अलवर लोकसभा मतदार संघातून भाजपचे जवंसत सिंग यादव विरुद्ध काँग्रेसचे डॉ. करण सिंग यादव (४० हजार मतांनी) तर अजमेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे रघु शर्मा विरुद्ध भाजपचे रामस्वरुप लांबा अशी लढत झाली. २०,६४८ मतांनी रघु शर्मा विजयी झालेत. तर मांडलगढ विधानसभा निवडणुकीत भाजपचे शक्ति सिंग हाडा विरुद्ध काँग्रेसचे विवेक धाकड यांच्यात लढत झाली.

...Read More

V. S. News
फेसबुकवरच्या ‘रिकामटेकड्यां’मध्ये घट

व्हीएस न्यूज - फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने आपल्या वेबसाईटमध्ये केलेल्या सुधारणांमुळे लोक या साईटवर कमी वेळ घालवत आहेत. खुद्द झुकेरबर्गनेच ही कबुली दिली आहे. फेसबुकच्या सामग्रीत केलेले बदल हे दर्शवितात, की वापरकर्त्यांनी या सामाजिक नेटवर्कवर खर्च केलेल्या एकूण वेळेत5टक्के घट झाली आहे, असे फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या झुकेरबर्गने गुंतवणूकदारांना सांगितले.

कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा कमाई अहवाल बुधवारी प्रकाशित करण्यात आला. या अहवालासोबत प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात झुकेरबर्गने म्हटले आहे,की “एकूणच आम्ही जे बदल केले त्यामुळे फेसबुकवर प्रत्येक दिवशी सुमारे 5 कोटी तास कमी खर्च करण्यात आले.”

न्यूज फीडमध्ये कमी व्हायरल व्हिडीओ प्रदर्शित करण्याच्या निर्णयामुळे घट झाली आहे, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच, अमेरिका आणि कॅनडामध्ये दैनिक वापरकर्त्यांमध्येही फेसबुकने पहिल्यांदाच घट नोंदविली आहे. या भागात मागच्या तिमाहीत 18 कोटी 50 लाख वापरकर्ते होते, ते या तिमाहीत 18 कोटी 50 लाखापर्यंत कमी झाले आहेत. या महिन्यात फेसबुकने वापरकर्त्यांना न्यूज फीडमध्ये ब्रँड व प्रकाशकांच्या मजकुरापेक्षा मित्रांकडून अधिक माहिती दाखविण्याची घोषणा केली. विशेषतः वापरकर्त्यांनी टिप्पणी किंवा शेअर न करता पाहिलेल्या किंवा वाचलेल्या सामग्रीवर झुकेरबर्गचा कटाक्ष होता.

...Read More

V. S. News
विराट कोहलीची गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी

व्हीएस न्यूज - टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या टीम इंडियासाठी ही दिलासादायक बाब असून कर्णधार विराट कोहलीचेही भारताच्या विजयात मोठे योगदान होते. ११९ चेंडूत त्याने ११२ धावांची खेळी केली.

या शतकासोबतच मोठ्या विक्रमाची बरोबरी विराटने केली असून त्याने कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बरोबरी केली. कर्णधार या नात्याने गांगुलीच्या नावावर १४६ सामन्यात ११ शतके आहेत. तर हा आकडा विराटने ४४ सामन्यातच गाठला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांच्याही नावावर कर्णधार या नात्याने प्रत्येकी सहा शतके आहे.

...Read More

V. S. News
बिटकॉईन सारखे चलन भारतात चालणार नाही – अरुण जेटली

व्हीएस न्यूज - भारतात बिटकॉईन सारखे चलन चालणार नाही आणि त्याचबरोबर भारतात बिटकॉईन संपूर्णपणे बेकायदा असून काळा पैसा साठवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

जगभरात सर्वात महागडे चलन म्हणून बिटकॉईन हे चलन ओळखले जाते. बिटकॉइन हे चलन ऑनलाइन गेमिंग क्विझ पूर्ण केल्यानंतर मिळते. वित्तीय व्यवहारांसाठी बिटकॉईन हे सर्वात जलद आणि कार्यक्षम चलन मानले जाते. दरम्यान जगभरातील कम्प्यूटर्समध्ये व्हायरस पाठवूनही खंडणी मागण्याचे काम बिटकॉइन मार्फत केले जात आहे. त्यामुळे अनेकांना याचा धोका पत्करावा लागला आहे.

बिटकॉईनचा काळा पैसा, हवाला घोटाळा, ड्रग्सची खरेदी, कर चुकवणे आणि दहशतवादी कारवायांमध्ये अतिवापर झाल्याने बिटकॉईन चलन चर्चेचा विषय झाला आहे.

...Read More

V. S. News
बदलत्या जीवनशैलीला आचाराने आणि विचाराने कृतीशील बनवा

व्हीएस न्यूज - विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवी जीवन अमूलाग्र बदलले. यामध्ये नैतिक आचार आणि विचाराची मोठ्या प्रमाणात घसरण झाली. विभक्त कुटुंबपध्तीमुळे संवाद हरवला. हव्यास वाढला. मोकळीक वाढली. बंधन नाहीशी झाली. त्यामुळे भारतामध्ये घटस्फोटाच्या प्रमाणात सध्य परिस्थितीत मोठी वाढ झाली आहे. यासाठी संस्कृती आचार आणि विचार यांना कृतीशील बनवणे व वास्तव जीवन जगणे हेच आपले कर्तव्य असणार आहे, असे मत प्रा. शितल वाघमारे व प्रा. प्रकाश ताम्हाणे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित प्रितम प्रकाश कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने
आजीवन अध्ययन आणि विस्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत 'विवाहपूर्व समुपदेशन' या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी ते बोलत होते. य़ाप्रसंगी
महाविद्यालयाचे प्राचार्य, सदाशिव कांबळे होते. प्रशासकीय अधिकारी भास्कर पांडुरंग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन विभा ब्राम्हणकर यांनी केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. विजय निकम यांनी केले. आभार डॉ. हनुमंत शिंदे यांनी मानले.
...Read More

V. S. News
प्रकाशनापूर्वीच दहावीचा अभ्यासक्रम व्हॉट्सअॅपवर व्हायरल

व्हीएस न्यूज - इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांच्या निर्मितीचे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून सुरू असतानाच तो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यामुळे बुधवारी खडबडून जागे झालेल्या शिक्षण मंडळाने मुंबईतील दादर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.

प्रकाशनापूर्वीच इयत्ता दहावीची विज्ञान आणि तंत्रज्ञान : भाग १ व २ या विषयांची पुस्तके पुणे आणि इतर शहरात व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली. मंडळाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेली प्रत व मंडळाची प्रत याबाबत तपास करून प्रत्यक्ष वस्तुस्थिती तपासण्याबाबत दादर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय सायबर शाखेलादेखील या प्रकरणाचा तपास करण्याविषयी कळवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून लवकरच नेमके काय घडले याविषयी ते छडा लावतील. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक सुनील मगर यांनी दिली.

...Read More

V. S. News
नाथाभाऊंनी घेतली राहुल गांधींची भेट ?

व्हीएस न्यूज एकनाथ खडसे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने दिले असून आहे. काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय खडसेंनी घेतला असून त्यांनी सून रक्षा खडसेंसह राहुल गांधी यांची भेट घेतली. या प्रसंगी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते, असा दावा वृत्तात करण्यात आला आहे.

एकनाथ खडसे राज्यात दोन लोकसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या अगोदरच वाजतगाजत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही वृत्तात करण्यात आला. एकनाथ खडसे २९ जानेवारीला दिल्लीला रवाना झाले. विमानात त्यांच्यासोबत पृथ्वीराज चव्हाण हे देखील होते. रक्षा खडसे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी खडसे कुटुंबीय मुक्कामी होते. खडसेंनी ‘सामना’च्या वृत्ताबाबत बोलताना हे वृत्त फेटाळले आहे. विमानतळावर पृथ्वीराज चव्हाण, मोहन प्रकाश या दोघांची योगायोगाने भेट झाली, असे त्यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
अर्थसंकल्पातून नवभारताच्या निर्मितीचा संकल्प : फडणवीस

व्हीएस न्यूज - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ-सबका विकास’ ही संकल्पना या अर्थसंकल्पामुळे आणखी विस्तारित झाली आहे. नवभारताच्या निर्मितीचा संकल्प सर्वसमावेशक असलेल्या या अर्थसंकल्पातून करण्यात आला असून त्यातून शेतकरी, गरीब, महिला,युवक, मागासवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना न्याय देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, सुमारे दोन दशकांची किमान आधारभूत किंमतीसंदर्भातील (एमएसपी) शेतकऱ्यांची मागणी आज पूर्ण झाल्याने हा एक ऐतिहासिक क्षण असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाच्या दीडपट एमएसपी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जास्तीच्या बाजारपेठा उपलब्ध करण्यासह शेतीक्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि फलोत्पादनास चालना देण्यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. सिंचन प्रकल्पांसाठी राज्य सरकारने नाबार्डच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचीही पूर्तता करण्यात आल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. त्यासाठी मी मोदी, जेटली आणि नितीन गडकरी यांचा अतिशय आभारी आहे.

मुंबईच्या लोकल रेल्वे वाहतुकीला अधिक भक्कम करण्यासाठी ४० हजार कोटींची भरीव तरतूद ही मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रासाठी आनंददायी असून इतका मोठा निधी आजवर कधीही मुंबईला प्राप्त झालेला नव्हता. १० कोटी लोकांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न झाला आहे. यात ७ कोटी महिला आणि ५ कोटी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आहेत. त्यात आणखी ३ कोटी अतिरिक्त रोजगारनिर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!